दातृत्व असलेले नेते आ. रमेशआप्पा कराड यांचा
अंध कुटुंबातील मुलीच्या लग्नाला हातभार
लातूर २५ – सातत्याने गरजूंना, आडलेल्यांना, नडलेल्याना मदतीचा हात देणारे भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या अंध कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी लग्नात द्यावयाच्या भांड्यासह व इतर कपडे देऊन आधार दिला. लग्नकार्यास हातभार लावला. मदत करण्याची इच्छाशक्तीच असावी लागते ती आ. रमेशआप्पा कराड यांच्या कृतीतून वेळोवेळी पहावयास मिळाली असल्याची अशी भावना या निमित्ताने अनेकांनी बोलून दाखवली.
लातूर शहरा लगत असलेल्या आर्वी येथील रहिवासी लहू सूर्यभान अडगळे आणि त्यांच्या पत्नी वर्षा अडगळे यांनी त्यांची मुलगी कु. प्रगती हिच्यासमवेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांची भाजपाच्या संवाद कार्यालयात भेट घेतली. आणि आपल्या मुलीचा ४ डिसेंबर रोजी अंबाजोगाई येथील गणेश गायके यांच्या समावेत होणाऱ्या विवाहाची वार्ता देऊन लग्नाला येण्याची आणि मदत करण्याची विनंती केली.

क्षणाचाही विलंब न करता आ. रमेशआप्पा कराड यांनी सदरील दिव्यांग अंध लहू अडगळे आणि त्यांच्या पत्नीस काय मदत करू अशी विचारणा केली असता त्यांनी हालाखीची परिस्थिती असल्याने मुलीला लग्नात संसार उपयोगी वस्तू मी देऊ शकत नाही आपण जर दिलात तर खूप मोठी मदत होईल अशी भावना व्यक्त केली. तेव्हा आ. कराड यांनी सदरील कुटुंबास मुलीच्या लग्नासाठी संसार उपयोगी भांडी आणि कपडे देऊन लग्न कार्यास हातभार लावला आणि लग्नानिमित्त शुभ आशीर्वाद दिले.
आप्पासाहेबांनी मुलीच्या लग्नासाठी संसार उपयोगी वस्तू आणि कपडे दिले खूप मोठी मदत केली. त्याबद्दल लहू सूर्यभान अडगळे यांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले तर अंध कुटुंबातील मुलीच्या विवाह सोहळ्यास मदत मदत करता आली याचे मनस्वी समाधान मिळाले असल्याची प्रतिक्रिया आ. कराड यांनी व्यक्त केली.

गोरगरीब माणसाला, अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मदत करण्याची भावना असल्याचे वेळोवेळी आ. रमेशआप्पा कराड यांच्या कृतीतून दिसून आले आहे. आतापर्यंत असंख्य जळीतग्रस्त कुटुंबांना, आपदग्रस्त शेतकऱ्यांना, गरजू महिलांना, विद्यार्थ्यासह खेळाडूंना मदत केली आहे. मदत करण्याची इच्छाशक्ती असणारा एकमेव नेता आ. रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून गरजवंताना, गोरगरिबांना लाभला. त्यांनी गोरगरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम वेळोवेळी केले. केवळ नेता असून चालत नाही तर अडचणीची जाणीव असणारा नेता असायला हवा अशी प्रतिक्रिया अनेकांनी बोलून दाखविली.