लातूर
लातूर जिल्ह्यातील उदयोनमुख गझलकार तथा शायर अझहर शेख यांच्या एहसासों का फलक या प्रथम पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी योगीराज माने , प्राचार्य श्री अंकुश विभुते, अभिनेते तथा दिग्दर्शक श्री अनिल कांबळे, दिशा प्रतिष्ठान चे अध्यक्ष सोनू डगवाले ,समाजसेविका ऍड. सौ. वैशालीताई लोंढे, जी. आर. सूर्यवंशी, चित्रपट निर्माते तथा दिग्दर्शक शादूल बौडीवाले यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाची ची सुरवात प्रा . नूरजहां सय्यद यानी दास्तान ए महफिल व एहसासों का फलक या पुस्तकाचे प्रास्तक्विकता करत केले.
अगदीच ग्रामीण भागातून जिथं गझल या प्रकारचं लवलेश हि दिसून येत नाही तिथून गझल आणि शायरी चे व्यासपीठ गाजवणे नक्कीच सोपे नाही. अश्या परिस्थितीत एक अत्यंत सुरेख आणि वाचनीय, सामाजिक संदेश देणारे गझल व कविता संग्रह अझर शेख या तरुणाने पुस्तकाच्या स्वरूपात रसिकांना उपलब्ध करून दिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथील हमरूह पब्लिकेशन या प्रकाशनाने केले आहे. या पुस्तका ची प्रस्तावना प्रा . नूरजहां सय्यद व शुभेच्छा आकाश कविता नानासाहेब सोनकांबळे यानी दिले आहे . या वेळी दास्तान ए महफिल लातुर चे सर्व सदस्य उपस्थित राहुन अपले मनोगत वेक्त केले व तसेच स्वाभिमान युवा मंच वलांडी चे अध्यक्ष मुकेश कांबळे उपाध्यक्ष रहीम शेख व सचिव नितिन वाघमारे व सर्व सदस्य उपस्थित होते. पत्रकार भवन लातूर येथे संपन्न झालेल्या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचलन विशाल जाधव व सुमित हसाळे यांनी तर आभार शाम माने यांनी मानले.