दिलीपकुमार यांचे निधन
दिलीपकुमार आज आपल्यात नाही.दिलीपकुमारचा सिनेमा पाहिला नाही असा माणूस विरळाच.मला लहान पणापासून पिक्चर पाहयचा छंद असल्यामुळे दिलिप कुमारचे मी अनेक चित्रपट पहिले.त्याने ईतक्या चित्रपटात काम केले आहे कि अनेक पाहयचे राहून गेले असणारच.पण जे पाहिले ते अजूनही स्मरणात कालच पाहिल्यासारखे आहेत.त्याच्या Intense अभिनयाचा तो परिणाम असावा.
आम्ही खेतवाडीत राहत होतो.त्याच्या जवळ ईतकी चित्रपटगृह आहेत जितकी देशात काही ठिकाणीच असतील.अलंकार(पुर्वीचे कमल),ड्रीमलॅन्ड ( पूर्वीचे कृष्ण)मोती,ताज,लॅमिन्टन रोडवर लायनिने रॉक्सि,ईम्पिरीयल,नाझ,स्वस्तिक,नॉवेल्टी,मिनर्वा,सुपर ईत्यादि ईत्यादी,फोरास रोड ला दाटीवाटीने चित्रपटगृह.साठीच्या दशकात सकाळच्या मॅटिनी शोला कुठेतरी दिलिप कुमारचा चित्रपट हमखास असायचाच.तेव्हा अनेक पाहिले.ते त्याचे जुने चित्रपट.तसा मधुमती खेतवाडी ७ वी गल्ली गणेशोत्सवात गल्लीत पडद्यावर पाहिला तर कोहिनूर ६ व्या गल्लीत गणेशोत्सव मंडळाने दाखवला.दिल तडप तडप के कह रहा है ‘मधुमती’ आणि मधुबनमे राधिका नाचेरे ‘कोहिनूर’ गाण्याच्या वेळेला अभिनय करणारा दिलीप कुमार अजूनही डोळ्यासमोर.त्या पडद्यासकट.गंगा जमना,मुगले आझम सुपर डुपर हिट. नंतरचा लिडर,सौदागर मधली जुगलबंदी,विधाता जावूद्या यादी फारच मोठी आहे.
दिलिप कुमारच्या आयुष्याची दुसरीहि बाजू आहे.सेक्युलर,अमनपसंद पुरोगामी नागरिक.ऊर्दु त्यानेच बोलावे ते ऐकत राहावे अस वाटत.त्यामुळेच मशाल मधला पत्रकार दिलिप कुमार ,हम मेहनतकश जगवालोसे जब अपना हिस्सा मांगेंगे एक खेत नही एक देश नही हम सारी दुनिया मांगेंगे म्हणणारा मजदूर मधिल दिलिप कुमार,नया दौर मधिल दिलिप कुमार खरा वाटतो.ट्रॅजिडी असो,विनोदी संवाद असो त्याचे चित्रपट म्हणजे त्याच्या अभिनयामुळे दिर्घकाळ स्मरणात राहणारे.भारतात प्रमुख अभिनेते कोण होऊन गेले अस विचारल तर दिलिप कुमार हे नाव चिरकालीन अग्रभागी राहील.
.भावपूर्ण आदरांजली..











