बेलकुंडच्या मारुती कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आ.अभिमन्यू पवार यांनी घेेतली देशमुखांची भेट...
सभासदांना शेअर्स पूर्ततेसाठी जिल्हा बँकेमार्फत वाढीव पीककर्ज मंजूर करावे.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकंबी, एकंबीवाडी व एकंबीतांडा ही गावे समाविष्ट करावीत,
निलंगा -(प्रशांत साळुंके)- बेलकुंड (ता.औसा) येथील संत शिरोमणी मारुती महाराज कारखान्याच्या सभासदांच्या व शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात माजी मंत्री तथा लातूर जिल्हा बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांची आमदार अभिमन्यू पवार यांनी दि.६ सप्टेंबर रोजी शिष्टमंडळासह भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सभासदांना शेअर्स पूर्ततेसाठी जिल्हा बँकेमार्फत वाढीव पीककर्ज मंजूर करावे मारुती महाराज कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकंबी, एकंबीवाडी व एकंबीतांडा ही गावे समाविष्ट करावीत अशी विनंती आमदार अभिमन्यू पवार यांनी माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे केली.
बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे जवळपास ७ हजार २०० सभासद आहेत. २०१० व २०१८ साली केंद्र सरकारने सभासद शेअर्स किंमतीत वाढ करून १५ हजार रुपये इतकी केली आहे. बहुतांश सभासद हे ५ हजार व १० हजार रुपयेचे शेअर्सधारक असून कारखाना प्रशासनाने उर्वरित भागाची रक्कम भरण्यासंदर्भात थेट नोटीस बजावली आहे. कारखान्याचे ऊस गाळप बंद असल्याने तसेच कोरोना व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली असून वाढीव रक्कम न भरल्यास अक्रियाशील सभासद ठरण्याचा व मतदानासह इतर अधिकारांवर गदा येण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही वाढीव रक्कम भरण्यासाठी जिल्हा बँकेमार्फत संबंधित शेतकऱ्यांना वाढीव पीककर्ज उपलब्ध करून द्यावे किंवा ते वाढीव रक्कम न भरल्याने सभासद अक्रियाशील ठरणार नाहीत अशी घोषणा करावी अशी विनंती आ. अभिमन्यू पवार यांनी माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे करुन मारुती महाराज कारखान्याचे एकंबी, एकंबीवाडी व एकंबीतांडा या गावांमध्ये जवळपास ३०० सभासद आहेत. ही गावे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नसल्याने मागच्या निवडणुकीपूर्वी त्यांना अक्रियाशील सदस्य घोषित करण्यात आले. ही तिन्ही गावे मांजरा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असून त्यांना मारुती महाराज कारखान्याच्याही कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी मांजरा कारखान्याने नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे. त्यामुळे एकंबी, एकंबीवाडी व एकंबीतांडा हे गावेे दोन्ही साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात संयुक्तपणे समाविष्ट राहातील व या गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मारुती महाराज साखर कारखान्याचे सभासदत्व प्राप्त होईल. अशी विनंती यावेळी आ. अभिमन्यू पवार यांनी माजीीमंत्री दिलीीपरा देशमुख यांच्याकडे केली.
या मागण्यांबाबत तांत्रिक माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेण्याविषयी दिलीपराव देशमुख यांनी आश्वस्त केले आहे. यावेळी मतदारसंघात सुरु असलेली शेतरस्त्यांची, फळबाग लागवडीची व इतर विकासकामे तसेच जळगाव येथील शेतकरी अभ्यास दौरायांबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. शेतकरी हिताला प्राधान्य देऊन सुरु असलेल्या कामांबाबत दिलीपराव देशमुख यांनी आ. अभिमन्यू पवार यांचे कौतुक करून सदिच्छा व्यक्त केल्या. मारुती महाराज कारखाना सुरू व्हावा यासाठी आ. अभिमन्यू पवार हे पाठपुरावा करीत होते, कारखाना सुरू होण्यासाठी आवश्यक निधी जिल्हा बँकेमार्फत उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. पवार यांनी दिलीपराव देशमुख यांचे आभार मानले.यावेळी सोबत भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, चंद्रशेखर सोनवणे, काकासाहेब मोरे, प्रा भीमाशंकर राचट्टे, दत्ता पाटील, युवराज बिराजदार, रमेश वळके, राजकिरण साठे, शिवाजी भोसले, बाबासाहेब भोसले, अमर बिराजदार, संजय कुलकर्णी, दीपक मुसांडे, अजय साळुंके, बालाजी सांडूर, नंदकुमार आनसरवाडे, श्रीकृष्ण जगताप, काकासाहेब पाटील, संजय पाटील, व्यंकट जगताप, काशीनाथ भोसले आदी उपस्थित होते.