दिलीपराव देशमुख यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट वर नियामक मंडळावर सदस्य म्हणून बिनविरोध निवड
लातूर दि. १९.
राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक सहकार क्षेत्रातील तज्ञ असलेले आणि विलास रत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख साहेब यांची पुणे मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या सहकारी संस्थेवर नियामक मंडळावर बिनविरोध सदस्य म्हणून निवड जाहिर करण्यात आली आहे तसे पत्र आज १९ एप्रिल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे महासंचालक व निवडणूक समितीने चेअरमन शिवाजीराव देशमुख यांनी कळवले आहे.


माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना अमित विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे व्हॉईस चेअरमन अनंतराव देशमुख, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जागृती शुगर च्या अध्यक्षा सौ गौरवि अतुलजी भोसले (देशमुख) उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, ट्वेण्टी वन शुगर चे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास साखर कारखान्याचे अध्यक्षा वैशालीताई विलासराव देशमुख, उपाध्यक्ष रवींद्र काळे,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे