*उसाचा दर, तात्याचे स्मारक यासंदर्भात माजी मंत्री दिलीपराव देशमुख आणि आ. रमेशअप्पा कराड यांच्यात सकारात्मक चर्चा*
मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या ऊसाला एफआरपी प्रमाणे ऊसाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी त्याच बरोबर स्वर्गीय बब्रुवानजी काळे तात्या यांचे मांजरा कारखाना परिसरात स्मारक उभे करण्याबाबत मांजरा कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री दिलीपराव देशमुख आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांच्यात शनिवारी अत्यंत सकारात्मक चर्चा झाली.

ऊस दर आणि स्वर्गीय तात्यांचे स्मारक याबाबत आ रमेशआप्पा कराड यांनी शनिवारी मा. दिलीपराव देशमुख यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांना जास्तीचे चार पैसे मिळाले पाहिजेत याबद्दल कोणाच्या मनात दुमत असण्याचे कारण नाही. गाळप केलेल्या ऊसाची लवकरच अपेक्षित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे यावेळी दिलीपराव देशमुख यांनी बोलून दाखविले. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदीप पाटील खंडापूरकर, जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, लातूर बाजार समितीचे संचालक विक्रम शिंदे, तात्याराव बेद्रे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश आंबेकर, वसंत करमुडे, अमोल पाटील, दिलीप धोत्रे, भाजपाचे लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, रेनापुर तालुका अध्यक्ष अँड दशरथ सरवदे यांच्यासह अनेक जण होतेे.












