*बाबासाहेब परांजपे फाउंडेशन वाचनालयात दिवाळी अंक वाचन योजनेस प्रारंभ*
लातूर *मुलांना वाचनाची आवड निर्माण करण्यात पालक पालकांची भूमिका महत्त्वाची असे प्रतिपादन श्रीमती अरुणा दिवेगावकर यांनी केले*. पालकांनी मुलांना लहानपणापासूनच दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिल्यास मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बाबासाहेब परांजपे फाउंडेशन, लातूर आयोजित दीपावली अंक वाचन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती हेमलता वैद्य तर प्रमुख उपस्थिती श्रीमती सुशीला पिंपळे नारनवरे व श्री रमेश चिल्ले यांची होती. याप्रसंगी डॉ बी.आर.पाटील, श्री सूर्यकांत वैद्य,डॉ.अशोक नारनवरे, डॉ.अनिल जायभाये,श्रीमती प्रतिभा गोमसाळे,श्री दिलीप कानगुले आदी मान्यवर उपस्थित होते. श्री रमेश चिल्ले यांनी सध्याच्या युगामध्ये वाचनापासून दूर घेऊन जाणाऱ्या अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. टीव्ही, मोबाईल या सगळ्यापासून दूर घेऊन जाऊन परत एकदा वाचनाची नाळ जोडणे गरजेचे आहे असे सांगितले.

बाबासाहेब परांजपे फाउंडेशनचा दिवाळी विविध उपक्रमांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना श्रीमती सुशिला पिंपळे नारनवरे यांनी दिवाळीमध्ये दिवाळी फराळ पेक्षाही दिवाळी अंक वाचायला जास्त आवडतं असं प्रतिपादन केलं आणि जास्तीत जास्त लोकांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले… कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री भाऊसाहेब उमाटे यांनी तर आभार डॉ. बी. आर.पाटील यांनी मानले.
*काय आहे दिवाळी अंक वाचन योजना*… या योजनेत दोनशे रुपयात शंभर दिवाळी अंक वाचता येतात एका वेळी एक अंक घरी घेऊन जाता येतो… आठ दिवसात तो अंक परत करून दुसरा अंक घेऊन जाता येतो…संपर्क बाबासाहेब परांजपे फाउंडेशन वाचनालय, जिल्हा क्रीडा संकुल, लातूर











