23.4 C
Pune
Monday, October 27, 2025
Homeसांस्कृतिक'दिवाळी संध्या' मैफलीस लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘दिवाळी संध्या’ मैफलीस लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूरमध्ये ‘दिवाळी संध्या’; राहुल देशपांडे यांच्या सुरांनी उजळली पाडव्याची रात्रविलास को-ऑपरेटिव बँकेच्या ‘दिवाळी संध्या’कार्यक्रमाला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर प्रतिनिधी : बुधवार, २२ ऑक्टोबर २०२५ :दिवाळी पाडव्याच्या शुभसंध्येला सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गायनाचा सुरेल सोहळा लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात रंगला. विलास को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने बुधवार, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या या ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रमाला लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख आणि टवेन्टिवन ॲग्रीच्या संचालीका अदिती अमित देशमुख यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपावलीच्या पणतींचे प्रज्वलन करण्यात आले. या मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला झळाळी लाभली. दिवाळी पाडव्याच्या शुभसंध्येला सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गायनाचा सुरेल सोहळा रंगला.

कार्यक्रमाची सुरुवात ‘तुज मागतो मी आता’ या गाण्याने केली. त्यानंतर त्यांनी हम तेरे प्यार मे सारा भुल जाए, पाणी रे पाणी हाय नयनो मे भर जाए, सैया तु है मेरा, आप की बातो मे कोई शरारत तो नही, हमको को मिली ऊसकी सजा, विठठल विठठल असे मधुर एका मागोमाग एक गीत सादर केले, ज्याला लातूरकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राहुल देशपांडे यांनी यावेळी शास्त्रीय संगीत, भावगीत आणि गझलांच्या स्वरांनी श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. त्यांच्या स्वरांमधून पसरलेले रसिकतेचे सुवासिक वातावरण आंबेडकर उद्यानात दरवळत राहिले. दिवाळीच्या या सांगीतिक संध्येला लातूरकरांची प्रचंड उपस्थिती लाभली, ज्यामुळे हा सोहळा संस्कृती आणि उत्सवाचा संगम ठरला

.यावेळी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, विलास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, ट्वेंटीवन ॲग्रीच्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख, डॉ. सविता शिवाजी काळगे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, विलास को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन किरण जाधव, व्हा. चेअरमन समद पटेल, आबासाहेब पाटील, यशवंतराव पाटील, विजय देशमुख, अशोक गोविंदपूरकर यांची उपस्थिती होती.दिवाळीच्या या सांगीतिक संध्येला लातूरकरांची प्रचंड उपस्थिती लाभली. कुटुंबासह आलेल्या नागरिकांनी उत्साहाने टाळ्यांच्या कडकडाटात प्रत्येक सुरेल प्रस्तुतीचा आस्वाद घेतला.

संस्कृती आणि उत्सवाचा संगम घडवणाऱ्या या ‘दिवाळी संध्या’ने लातूरकरांच्या दीपोत्सवात आनंदाचे आणि अभिमानाचे नवे सूर फुलवले.कार्यक्रमास सर्जेराव मोरे, अनंतराव देशमुख, सचिन पाटील, डॉ. कल्याण बरमदे, ऋषिकेश पाटील, गणेश एसआर देशमुख, जितेंद्र सपाटे, राजेंद्र काळे, व्यंकटेश पुरी, सूर्यकांत कातळे, पंडित कावळे, अभय शहा, स्मिता खानापुरे, अरुण कामदार, संभाजी सुळ, सीए प्रकाश कासट, ॲड. उदय गवारे, सत्तार शेख, प्राचार्य बालाजी वाकुरे, गोविंद देशमुख, आयुब मणियार, धनंजय शेळके, राजा माने, गोटू यादव, विष्णुदास धायगुडे, पप्पू घोलप, पिंटू साळुंखे, सुपर्ण जगताप, इसरार सगरे, पत्रकार अरुण समुद्रे पत्रकार दीपरत्न निलंगेकर, बसवंतआप्पा भरडे, गंगाधरआप्पा हामने, बाबासाहेब गायकवाड, दगडूआप्पा मिटकरी, गिरीश ब्याळे, विजय गायकवाड, प्रा.प्रवीण कांबळे, विजयकुमार साबदे, सचिन बंडापले, युनूस मोमीन, तबरेज तांबोळी, नागसेन कामेगावकर आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्कृती आणि उत्सवाचा संगम घडवणाऱ्या “दिवाळी संध्या”ने लातूरकरांच्या दीपोत्सवात आनंदाचे आणि अभिमानाचे नवे सूर फुलवले.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]