*दिवे लावा दिवे…*

0
353

जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता झाला ; माञ नविन वर्षात निटूर बसथांब्यावरील दिवे कधी लागणार..

निलंगा,-( प्रशांत साळुंके )-जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ( 752 ) या मार्गावरील निलंगा तालुक्यातील निटूर येथील बसथांब्यालगत असणारे प्रकाशमय दिवे लावण्याची मागणी व्यापारी आणि नागरिक करित आहेत.
निलंगा तालुक्यातील निटूर गावाची लोकसंख्या सोळा हजाराच्या घरात असल्याने या गावाशी निगडीत शैक्षणिक,व्यवहारिक,प्रशासकीय कार्यालय याठिकाणी आहेत.माञ,निटूर येथील बसथांब्यावरील अद्यापही प्रकाशमय दिवे लागत नसल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत.याकरिता जहिराबाद-लातूर यामार्गावरील अंधार दूर करण्यासाठी प्रकाशमय दिवे लावून सहकार्य करावी,अशी मागणी वाहनधारक करित आहेत.


निटूरची बाजारपेठ तालुक्यात व्दितीय क्रमांकाची असल्याने याठिकाणी आवक-जावक परिसरातील गावातील संख्या जास्त प्रमाणात येत असतात.तसेच,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,भारतीय स्टेट बँक,शाळा व महाविद्यालयीन असल्याने संख्या जास्त प्रमाणात येत असतात त्यामुळे याठिकाणच्या बसथांब्यालगत असणार्‍या प्रवाशांसाठी राञी बेराञी यामार्गावरून वाहने मार्गस्थ होत असतात याठिकाणी अंधारामय असल्याने प्रकाशमय दिवे नविन वर्षात केव्हा लावणार असा संतप्त सवाल वाहनधारक करित आहेत.त्यासाठी प्रकाशमय दिवे त्वरीत दिवे लावण्याची मागणी वाहनधारक आणि नागरिक करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here