दिशा प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी – माजी मंत्री दिलीपराव देशमुख
लातूर : गरजू रुग्ण आणि विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या ‘दिशा’चे सामाजिक कार्य समाधानकारक असून अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. सर्व स्तरावर शासकीय व्यवस्था पोहोचू शकत नसल्यामुळे ‘दिशा’ प्रतिष्ठानसारख्या सामाजिक संस्थांची समाजाला गरज असल्याचे मत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केली. ते लातूर शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथील दिशा प्रतिष्ठानच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी जग्गनाथ लकडे, अभिजित देशमुख, यशवंतराव पाटील, दिलीप माने, अनिल शिंदे, मनोहर कोरे, अभय साळुंके, डॉ. अरविंद भातांब्रे, डॉ. चेतन सारडा, डॉ.अशोक पोद्दार, तुकाराम पाटील तसेच दिशा प्रतिष्ठानचे सर्व संचालक आणि मार्गदर्शक उपस्थित होते.
पुढे बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की, ‘दिशा’च्या या सामाजिक कार्यात हातभार लावण्यासाठी समाजातील इतरांनीही पुढे येऊन सहभाग नोंदवावा. भविष्यात दिशाने महापालिकेची एखादी बंद पडलेली शाळा चालवायला घेऊन त्यात गरजू नाविन्यपूर्ण शिक्षण द्यावे असा सल्ला देत प्रतिष्ठानच्या वाटचालीस आपण सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासनही देशमुख यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी दिशा प्रतिष्ठानच्या वेब साईटचे ही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच तीन गरजू-होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी धनादेशाचे वाटप ही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिशा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अभिजित देशमुख यांनी केले. सूत्रसंचलन सोनू डगवाले यांनी केले.तर आभार इसरार सगरे यांनी मानले.




