●स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ; 750 सायकल लिस्ट सहभागी होणार●
◆ देशातील सर्वात मोठा इव्हेंट : आयर्न मॅन निकेत दलाल सहभागी होणार◆
लातूर; दि.११( प्रतिनिधी ) -भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील दीपस्तंभ परिवाराच्या वतीने दि. 14 ऑगस्ट 2022 रोजी ‘ पेडल फाँर नेशन 2022’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 750 सायकलिस्ट या उपक्रमात सहभागी होणार असून , अशा प्रकारचा हा देशातील सर्वात मोठा इव्हेंट आहे.
या उपक्रमाचे खास आकर्षण म्हणजे भारतातील पहिले अंध ॲथलेटिक्स ; भारताचे पहिले आयर्न मॅन म्हणून ज्यांची उभ्या देशाला ओळख आहे असे निकेत दलाल हे 75 किलोमीटर सायकल चालवून सर्वांना प्रोत्साहित करणार आहेत। जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. व पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे हिरवी झेंडे दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ करणार आहेत .

दीपस्तंभ ग्रुपच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त’ पेडल फॉर नेशन 2022′ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 750 सायकललिस्ट 75 किलोमीटर अंतर कुच करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास अभिवादन करणार आहेत. दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे 5:30 वाजता राजीव गांधी चौकातील बिडवे लावून येथून या उपक्रमात सुरुवात होणार आहे. 750 सायकललिस्ट 75 किलोमीटर, 50 किलोमीटर ,25 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अंतर पार करतील .लातूर , उदगीर, अहमदपूर, निलंगा, सोलापूर ,तुळजापूर ,लोहा आदी भागातील सायकलिस्ट या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

‘दीपस्तंभ’ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करणार !
‘दीपस्तंभ ‘ लातूरातील एक आगळा-वेगळा ग्रुप… रक्तदान चळवळ असो की अन्य कुठलाही सामाजिक प्रश्न .. यासाठी धावून जाणारा ग्रुप म्हणजे ‘दीपस्तंभ ‘…. !या ग्रुपच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष सोहळा एका आगळावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रशासन व विविध सामाजिक संघटना आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहेत . समाजाच्या विविध प्रश्नांसाठी धावून जाणाऱ्या आणि सामाजिक एकतेसाठी सदैव अग्रेसर असणारा ‘दीपस्तंभ’ ग्रुप यासाठी दूर कसा राहू शकतो … ? या ग्रुपच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा हा उत्सव सगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प केला आहे आणि ग्रुपचे अध्यक्ष योगेश कर्वा यांच्या मार्गदर्शनाखाली 120 जणांचे परिवार असणारे सदस्य यासाठी एकवटले आहेत .यासाठी त्यांनी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे .

देशातील या अनोख्या उपक्रमास सहभागी होणाऱ्या सायकलपटूंना बिडवे लाँन ते नवीन रेणापूर नाका या रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी उभे राहून पुष्पवृष्टी करून , टाळ्या वाजवून आणि भारत मातेचा जयघोष करून प्रोत्साहित करावे, असे आवाहन दीपस्तंभ ग्रुपचे अध्यक्ष योगेश कर्वा, सचिव डॉ. अजय पुनपाळे तसेच प्रमोद भोयरेकर , ओमप्रकाश झुरळे, सोनू डगवाले,अमोल चव्हाण, रवी सौदागर, शैलेश रेड्डी आदींनी केले आहे.




