मुंबई; दि.७ ( प्रतिनिधी ) –
वृतपत्रकारिता,दूरदर्शन, आकाशवाणी,
शासकीय जनसंपर्क आणि आता डिजिटल माध्यमात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माध्यमकर्मी श्री देवेंद्र भुजबळ यांना २ हजार सदस्य असलेल्या, एजेएफसी या पत्रकारांच्या राष्ट्रीय संघटनेकडून जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ३ मे रोजी मुंबईतील गांधी बुक सेंटर च्या
सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सत्काराला उत्तर देताना
श्री भुजबळ म्हणाले की,
जीवन गौरव पुरस्कार मिळाला म्हणजे,आपले जीवन कार्य संपले असे आपण समजत नसून ,
या पुरस्काराने
आता अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष , मार्मिक चे संपादक श्री मुकेश माचकर यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून पत्रकारांच्या स्वातंत्र्याला जसा बाह्य धोका असतो, तसाच तो व्यवस्थापनाकडून ही निर्माण होत असतो, याकडे लक्ष वेधले.

निवृत्त माहिती उपसंचालक डॉ संभाजी खराट यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि संबंधित बाबींचा सविस्तर उहापोह केला.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल यांनी संघटनेची वाटचाल विशद करून भावी उपक्रमांची माहिती दिली.
एजेएफसी चे अध्यक्ष गणेश कोळी यांनी प्रास्ताविक केले तर
सूत्रसंचलन पत्रकार ईश्वर हुलवान यांनी केले.
याच कार्यक्रमात
ज्येष्ठ पत्रकार बाळ पाटणकर यांच्या
” इस्लामी जगत” पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास विविध मान्यवर आणि अनेक पत्रकारांची उपस्थिती होती.

अन्य पुरस्कार प्राप्त व्यक्ती पुढीलप्रमाणे आहेत.
१)आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मृती दर्पण पुरस्कार –
श्री. निलेश पोटे, वृत्तसंपादक
दै. अजिंक्य भारत, अकोला
२) जेष्ठ पत्रकार नवीन सोष्टे मराठी पत्रकार सन्मान पुरस्कार –
श्री. विठ्ठल मोघे,
दै. पुण्यनगरी, दौंड- पुणे
३) जेष्ठ पत्रकार जयानंद मठकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार –
श्री. निसार अली
४) मधुकर लोंढे स्मृती साप्ताहिक संपादक पुरस्कार –
श्री. किरण बाथम
५) हभप शरददादा बोरकर स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार –
रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील.




