28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र भुजबळ यांना मानाचा चौथास्तंभ पुरस्कार

देवेंद्र भुजबळ यांना मानाचा चौथास्तंभ पुरस्कार

पत्रकारितेत अत्यंत मानाचा समजला जाणारा चौथास्तंभ पुरस्कार सामाजिक सेवा वर्गात न्यूज स्टोरी टुडे या आंतरराष्ट्रीय, वेबपोर्टलचे संपादक, निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांना जाहीर करण्यात आला आहे. या पोर्टलवर सामाजिक बांधिलकीतून वृत्त, लेख, यशकथा प्रसिद्ध करण्याच्या यशसाधनेबाबत त्यांना हा पुरस्कार मिळाला असून त्यांचे विविधस्तरावरून अभिनंदन होत आहे.

पत्रकारितेचे नवे दालन उभे करून ते यशशिखरावर नेण्याच्या श्री. भुजबळ यांच्या संपादन कौशल्यावर अप्रतिम मिडियाच्या चौथ्या स्तंभ पुरस्काराची उठलेली मोहोर, सगळ्यांनाच गौरवान्वित करून गेली आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हे विविध पुरस्कार अप्रतिम मिडियाने सार्वमत घेऊन जाहीर केलेत. त्यात पत्रकारितेच्या कामाची कसोटी तावून सुलाखून पाहिली गेली, अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे प्रमुख संपादक, डॉ अनिल फळे यांनी दिली. त्यामुळे एका सापेक्षी पत्रकाराचा झालेला गौरव उठून दिसणारा आहे.

श्री.भुजबळ संपादक असलेल्या, न्यूज स्टोरी टुडे या वेब पोर्टलवर
आगळ्या वेगळ्या स्टोरीज प्रसिद्ध करण्यात येतात. पाहता पाहता या वेब पोर्टलची लोकप्रियता वाढून सध्या जगातील ७७ देशातील ३ लाख २१ हजार १८० व्ह्यूज या पोर्टलला मिळाले आहेत. यातूनच देवेंद्र भुजबळ यांचे संपादकीय कौशल्य स्पष्ट होते. यात त्यांची पत्नी अलका व कन्या देवश्री यांची त्यांना पूर्ण साथ लाभली आहे. कुठल्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न करता, कुठलीही पगारी व्यक्ती न ठेवता या कुटुंबाचा सामाजिक बांधिलकीची जाणीव, समाजासमोर आचार, विचारांच्या आदर्शांचे मनोरे उभे करून त्यातून संस्कारीत समाजमन घडविण्याचा ध्यास स्पष्ट होतो. या ध्यासाचाच या पुरस्काराने गौरव झाला आहे.

कोरोनाच्या बिकट परिस्थितीत देवेंद्र भुजबळ समाज सेवाध्यासाला वेब पोर्टल मार्फत प्रवृत्त झाले. पाहता पाहता पोर्टलची लोकप्रियता त्यांच्या संपादन कौशल्यातून वाढली. यातून यशशिखराच्या कमानीचे नवे दालन त्यांच्याकरीता खुले झाले.

श्री.भुजबळ यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यात आणखी एक सन्मानाचा शिरपेच तुरा खोवल्या गेला आहे.

श्री.भुजबळ यांना पुरस्कार जाहीर करून सकारात्मक विचारसरणीचाच अप्रतिम मिडियाने गौरव केला आहे.


लेखन : प्रकाश कथले.
☎️9869484800

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]