मुंबई ; दि. ( प्रतिनिधी) –
भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फौंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या
“राज्यस्तरीय माणूसकी सेवा गौरव पुरस्कार” देवेंद्र भुजबळ यांना जाहीर झाला आहे.
समाजाप्रती दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे निवड समितीने पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ व विधानसभा उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख
उपस्थितीत नाशिक येथे २६ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
अल्प परिचय
श्री देवेंद्र भुजबळ हे सध्या www.marathi.newsstorytoday.com
या आंतरराष्ट्रीय
वेबपोर्टलचे संपादक आहेत.
पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागात बी सी जे करताना प्रा.ल ना गोखले पाठ्यवृत्तीचे ते सर्व प्रथम मानकरी ठरले.तर मराठवाडा विद्यापीठाच्या एम एम सी जे अभ्यासक्रमात ते प्रथम श्रेणीत सर्व प्रथम आले आहेत.
श्री भुजबळ पत्रकार, भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शनमध्ये निर्माता, महाराष्ट्र शासनाच्या माहिती खात्यात अधिकारी होते.माहिती संचालक म्हणून ते २०१८ साली निवृत्त झाले.
दूरदर्शनच्या गाजलेल्या “महाचर्चा” कार्यक्रमाच्या २०० भागांसाठी ते ४ वर्षे रिसर्च अँड रिसोर्स पर्सन तर आकाशवाणी वरील महाराष्ट्र शासनाच्या “दिलखुलास” कार्यक्रमाच्या पहिल्या ५०० भागांचे टीमलीडर होते.
महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज वेबपोर्टलसाठी “करिअर नामा” हे सदर त्यांनी सुरू केले . या सदरासाठी ते स्वतः नियमित लेखन करीत. हे लेख विविध वृत्तपत्रातूनही प्रसिद्ध झाले आहेत.
विविध क्षेत्रातील व्यक्तीं वर लिहिलेले “भावलेली व्यक्तिमत्वे”,
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अलौकीक पत्रकारिता पैलूवर लिहिलेले
“स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाजवल्य पत्रकारिता”
( मराठी व इंग्रजी ),
थोर व्यक्तींच्या जीवन कार्यावर लिहिलेले “अभिमानाची लेणी” हे ई -पुस्तक,
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या महिलांच्या प्रेरणादायी कथा असलेले
“गगनभरारी” ,
युवा आणि पुरुषांच्या प्रेरणादायी कथा असलेले
“प्रेरणेचे प्रवासी” कासार समाजातील ३५ व्यक्तींच्या यशकथा असलेले “समाजभूषण”
शेकडो सरकारी अभ्यासक्रम, प्रशिक्षण यांची माहिती असलेले
“करिअरच्या नव्या दिशा” ही त्यांची पुस्तके लोकप्रिय ठरली आहेत.
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात त्यांचे
“स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाजवल्य पत्रकारिता” या विषयावर झालेले व्याख्यान विशेष गाजले.
मलेशियातील चौथ्या विश्व शब्द साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते.
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता ” हा त्यांचा संशोधन पर लेख मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, ऊर्दू भाषेतही प्रसिद्ध झाला आहे . विविध विषयांवर ते सातत्याने लिहीत असतात.
कोरोनाच्या काळात
लोकांचे मनोधैर्य कायम राहण्यासाठी,
वाढण्यासाठी ते विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहेत.
श्री भुजबळ यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
देवेंद्र भुजबळ यांना
राज्यस्तरीय माणूसकी सेवा गौरव पुरस्कार