20.8 C
Pune
Wednesday, December 17, 2025

द कश्मीर


काय आहे द काश्मीर फाइल्स आणि काय आहे काश्मीर बाबतची राज्यघटना? का काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे? का काश्मीर मध्ये काश्मिरी पंडितांची हत्या झाली? त्यांना का हाकलून लावले?राज्य घटनेतील कलम ३७० काय आहे? कशासाठी कलम३७० ची निर्मिती झाली? चित्रपट द कश्मीर फाइल्स का पाहिला पाहिजे? कलम ३७९ ची निर्मिती कोणी केली? कोण होते काश्मीरचे राजा? काय होते संस्थानिक आणि संस्थाने?
भारताचा इतिहास हा महाभारतापासून सुरू होतो. भारत देश ह्या नावामागे भरत राजाचा इतिहास आहे. भारताला संघटित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या राजा चंद्रगुप्त ते सम्राट अशोका यांच्या अथक प्रयत्नांना जाणुन घेतले पाहिजे. हिंदू हा धर्म आहे, की विचारधारा, की मग संस्कृती? हे समजून घेतले पाहिजे. हिंदू संस्कृतीच्या एकदम विरोधी विचारधारा किंवा व्यवहार असणारा मुस्लिम पंथ किंवा समुदाय हा आपल्याच भावकीतला बागी गट आहे की देशाबाहेरील विचारधारेने आपल्या भूमीवर आणि आपल्या संस्कृतीवर आक्रमण करून केलेले अतिक्रमण आहे? हिंदूंचे शोषण,जबरदस्ती धर्मपरिवर्तन, सामूहिक नरसंहार,गुलामी, बलात्कार,हिंदुंच्या मूर्तीचा भंग करणे इत्यादींची सुरुवात इसवी सन ७१३ मध्ये मोहम्मद बिन कासिम या मुस्लिम आक्रमकाने सिंध प्रांतातील राजा दहिर यांच्यावर हमला करून सुरुवात केली.

अकराव्या शतकात मोहम्मद गजनवी या इस्लामिक विकृतीने मथुरा,उज्जैन,सोमनाथ मंदिर अशा हिंदूंच्या पौराणिक मंदिरांचा विध्वंस करून मथुरेतील ५०००हिंदूंना गुलाम बनवल्याचे अल उत्बी या मोहम्मद गजनवीच्या दरबारात असलेल्या इतिहासकाराने लिहून ठेवले आहे. यालाच अल उत्बी गैर- इस्लामिक प्रथांच्या विरुद्धचा जिहाद म्हणत असल्याचे लिहून ठेवले आहे.इतिहासकार विक्टोरिया स्कोफील्डने लिहलेल्या घटनेत गांधार देशावर इसवी सन ९८० मध्ये राजा जशपालला सबुक्ताजीन या परकीय आक्रमकाने मारले होते. इतिहासकार इब्न बतूता यांनी लिहिले की हिंदुकुश पर्वत हा पर्वत नसून तिथे हजारो हिंदूंचे शव आहेत ज्यांना बंधुआ मजदूर बनवून मुस्लिम शासक अरब देशात घेऊन जात असताना तिथल्या थंड हवेने आणि बर्फाने त्यांचा मृत्यू झाला.मोहम्मद गजनवीने इसवीसन १०२४ मध्ये सोमनाथ मंदिरातील शिवलिंगाला हाता पायाने भंग केले. मोहम्मद गोरी ने १०९२ इसवी सनमध्ये पाटण्यावर हमला करून कित्येक हिंदू मंदिरांना तोडले होते व हजारो हिंदूंचा नरसंहार केला होता,ज्याला दिल्लीच्या शेवटचे हिंदू सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांनी मारलं.मुस्लिम शासक ऐबक याने दिल्लीतील कुवत अल इस्लाम ही मस्जीद बांधण्यासाठी अनेक हिंदू आणि जैन मंदिरांना तोडून त्यांच्या अवशेषांचा वापर केला होता. खीलजी मुस्लिम शासकांनी तर भारतात प्रचंड नरसंहार केला. हिंदूंच्या आठ वर्षावरील प्रत्येक पुरुष जातीच्या मुलास मारून टाकले जेणेकरून हिंदूंची उत्पत्ती थांबली पाहिजे आणि हिंदू संपलाच पाहिजे,या धारणेतून अनेकोअनेक परकीय मुस्लिमांनी भारताची अखंडता भंग करून स्वतःची संख्या वाढविण्यावर भर दिला होता. आजही कित्येक कट्टर विचारधारेच्या मुस्लीम कुटुंबामध्ये कमीत कमी चार मुले व जास्तीत जास्त दहा ते बारा मुले आपणास पहावयास मिळतात. वाढत्या जागतिक लोकसंख्येचा विचार करता हे असे वर्तन पूर्ण पृथ्वीतलासाठी घातकच नाही का? हिंदू स्त्रियांवर अनन्वित अत्याचार त्या काळी केला गेला. आजही तुम्ही नीट निरीक्षण करून पहा,हिंदूंच्या प्रत्येक देवस्थान किंवा मठाच्या दरवाजावर कोणाची वस्ती आहे? तुम्हाला प्रश्न पडत नाही का?पडत नसेल तर तो पडू द्या.
मुस्लिम काझी,मुफ्ती यांनी इस्लामिक शासकांना नेहमी,हिंदूंना संपवणे, धर्मसंगत असल्याचेच सांगून हा पैगंबराचा आदेश असल्याचे सांगितले व त्या शासकांची सदैव दिशाभूल केली. हिंदूंची हत्या करणे,त्यांना लुटणे आणि त्यांचे धर्मांतरण करणे व त्यांना गुलाम बनवणे न्यायसंगत असल्याचे या लोकांनी पटवून दिले.मलिक काफुर या धर्मांतरित मुस्लिमांच्या नेतृत्वामध्ये इसवी सन १३०९ते १३११ या कालावधीत दक्षिण भारतात प्रचंड लूटपाट केली गेली व अनेक मंदिरांचा विध्वंस करून तेथील संपत्ती लुटली जी १००० उंटावर लादली होती,ज्यामध्ये प्रसिद्ध कोहिनूर हिरादेखील होता, जो की भद्रकाली मंदिरातील देवीमातेच्या डोळ्यात जडलेला एक हिरा होता,अशी इतिहासात नोंद सापडते.यानंतर आलेल्या तुगलक या मुस्लीम शासकाने तर हिंदू साधुंचा प्रचंड नरसंहार केला.जवळपास एक हजार साधूंना त्याने मारले.त्याच्या शासनामध्ये कोणीही हिंदू धार्मिक प्रथेचे पालन करण्याचा प्रयत्न केला तर त्याला काफिर ठरवून गैर इस्लामिक वर्तन या अपराधा खाली हालहाल करून मारले जात होते.फिरोजशहा तुघलक याने लिहून ठेवले आहे की त्याने हिंदूंना किती भयंकर पद्धतीने छळले ज्यामुळे त्याला आनंद झाला. जो कोणी हिंदू स्वतःच्या धर्माचे पालन करीत असेल त्याला प्रचंड छळले जाई. त्यानंतर आलेला तैमूरलंग (सैफअली खान नावाच्या हिंदी सिनेमातील हिरोने आपल्या मुलाचे नाव अभिमानाने तैमुर ठेवले आहे हे विसरून चालणार नाही.ज्याच्या वडिलांना त्यांच्या धर्मातील स्त्री पत्नी म्हणून आवडली नाही आणि खुद्द त्यालाही त्याच्या धर्मातील स्त्री पत्नी म्हणून आवडली नाही म्हणून त्या दोघांनी हिंदू स्त्रीशी विवाह केला आहे हे समजुन घेऊया)तैमुरलंग याने स्वतःच्या तैमूरलंग कुराणात लिहून ठेवले आहे की भारतावर आक्रमण करण्यामागे केवळ आणि केवळ कट्टर हिंदूंच्या विरुद्ध युद्ध,त्यांना संपवणे आणि स्वतःची मुस्लिम संख्या व सैन्य वाढवणे हा त्याचा उद्देश होता.तो पुढे लिहितो माझ्या इस्लामिक तलवारीने तासाभरामध्ये दहा हजार हिंदूंचे डोके धडावेगळे केले आणि माझ्या या तलवारीने काफिराच्या रक्ताने स्नान केली.याच तैमुरलंगने हिंदूंचा प्रचंड नरसंहार केला आणि हिंदू स्त्रिया आणि लेकरांना मात्र स्वतःचे गुलाम बनवून लुटून नेले.तुम्हाला या अमानवीय इस्लामिक संस्कृतीची विकृती काय होती हे जर पहावयाचे असेल तर तुम्ही खरेच मेरा सुलतान हे उर्दू सिरीयल नक्की पहा,तुम्हाला इस्लामिक वर्तनातील खरी कट्टरवादी मानसिकता या सिरीयल मधून समजून येईल.१४९९ इसवी सनमध्ये सिकंदर लोधी आणि बहलोल खान यांनी हिंदूंना तर जाळण्याचेच सत्र सुरू केले. इसवी सन १५२६ ते १५५६ या कालावधीत बाबर, हुमायून, सुरी यांनी हिंदू व शीख नागरिकांचा प्रचंड छळ केला त्यांनी यालाच इस्लामिक जिहाद हे नाव दिले होते.बाबरनामामध्ये स्पष्टपणे हिंदूंच्या नरसंहाराचा उल्लेख आढळतो.श्रीरामाचे मंदिर तोडून याच बाबराने बाबरी मस्जिद बनवली होती,आता अंतिम न्यायाने शेवटी ती श्रीराममंदिर रूपात पुनर्स्थापित झाली आहे.
साधारण सोळाव्या शतकापासून भारतभुमीवर बदल होण्यास प्रारंभ होऊन अनेक स्थित्यंतरे घडत गेली.तेराव्या शतकात अनेक हिंदू राजे मुस्लिमांशी टक्कर देत आपले राज्य जपत होते‌.मुस्लिम आक्रमण करण्याच्या प्रयत्नात राहून हिंदूंना त्रास देण्यात धन्यता मानणारे होते तर हिंदू संस्कृती ही नेहमीच जगा आणि जगू द्या अशी असल्यामुळे स्वतःहून कुणावर आक्रमणे करण्याची मानसिकता हिंदू कधीही बाळगुण नव्हते.पण तरीही खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांनी जमेल त्या पद्धतीने निकराने लढा दिल्याचा इतिहास देखील आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे,ज्यात राणी दुर्गावती चा फार मोठा इतिहास आहे.आपल्या देशावर झालेल्या इस्लामिक व परकीय आक्रमणाने पेटून उठलेल्या राजमाता जिजाऊ,कित्तूरची राणी चेन्नम्मा,झाशीची राणी लक्ष्मीबाई, यांचा उल्लेख आद्य व अत्यंत महत्त्वाचा ठरतो.छत्रपती शिवरायांची तिथीप्रमाणे जयंती उद्या आहे, त्यांनी ज्याप्रमाणे शत्रूला आणि त्याच्या मानसिकतेला हरवले ते खऱ्या अर्थाचे युद्ध होते ज्यात न्याय होता स्त्रियांबद्दल आदर व आपुलकी होती.
या आणि अशा भयंकर त्रासदीतूनही जो टिकला तो हिंदू संस्कृतीचा भारतीय आहे. परंतु दुर्दैव असे की त्यानंतर आपल्यावर स्वतःचा विळखा घातलेल्या ब्रिटिशांनी भारताला शंभर वर्षानंतर जे स्वातंत्र्य दिले त्यात पाकिस्तान नावाचा आतंकवादी देशही जन्माला घालून ठेवला आहे, ज्याने स्वातंत्र्यानंतरही वारंवार देशावर आधुनिक युद्धसामग्रीचा वापर करून हमले केले,नरसंहार केला, आणि विशेषबाब म्हणजे हे कृत्य आम्ही केले,तसा पैगंबराचा आम्हाला आदेश आहे असे सांगणारे लष्कर-ए-तैय्यबासारखे विकृत आतंकवादी पुढे येऊन छातीठोकपणे सांगू लागले.तरीही तथाकथित उपभोगवादी, चंगळवादी,सुखलोलुप अशा लोकशाहीतंत्रातील भारतीय लोकशाही सरकारने मात्र काहीच केले नाही हे षंढत्व नव्हे तर अजून काय होते?कोणत्याही धर्माने मुळात कट्टरवादी असूच नये.धर्म तोच खरा जो माणुसकी शिकवतो.ज्या धर्मामध्ये माणसाने, माणसाशी,माणसासम वागावे हे तत्व जिवंत आहे तोच धर्म करा खरा.परंतु स्वतःवर होत असणारी आक्रमणे,सहर्ष स्वीकारणे आणि निमूटपणे सहन करणे हे देखील दुबळेपणाचेच लक्षण असल्याने त्याचा विरोध करण्यासाठी आजच्या सरकारने जे पाऊल उचलले त्याच पावलाचा एक ठसा आहे कश्मीर मधील कलम ३७० ची हकालपट्टी. नेमके कलम ३७० काय आहे आणि त्यालाच जोडून आलेली द कश्मीर फाईल काय आहे? हे आपण पुढच्या भागात समजून घेऊया.


(क्रमशः)
ॲड.रजनी गिरवलकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]