23 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeसांस्कृतिक*धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाचा "मंगळागौर" कार्यक्रम*

*धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाचा “मंगळागौर” कार्यक्रम*

ठाणे (प्रतिनिधी )-: धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कृत धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ,ठाणे यांच्या वतीने खास धनगर समाजातील महिलांसाठी ‘चला खेळुया मंगळागौर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मंगळागौर पूजन हळूहळू कालबाह्य होत चाललंय. तरीदेखील काही संस्थांनी मंगळागौर साजरी करण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे मंगळागौरीच्या खेळातून महिलांच्या मनाला आनंद तर मिळतच असतो मात्र शरीराला व्यायामही होतो. आता महिला नोकरी करणाऱ्या असल्यामुळे मंगळागौर जागविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परंतु हा पारंपरिक खेळ टिकला पाहिजे यासाठी धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘चला खेळुया मंगळागौर’ कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना महिला आघाडी ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे,माजी उपमहापौर पल्लवी कदम,शिवसेना महिला आघाडी शहर संघटक वंदना डोंगरे, शुभांगी प्रशांत वारे,नम्रता कोळी,अनिता हिलाळ,सौ वैष्णवी पवार,सल्लागार मीना कवितके,अर्चना वारे,अनिता गुंड यांच्या हस्ते झाले यावेळी मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर,सचिव गायत्री गुंड,खजिनदार भारती पिसे,आदी यावेळी उपस्थित होते.

“नखुल्याबाई नखुल्या, चंदनाच्या टिकुल्या, एक टिकली उडाली, गंगेत जाऊन बुडाली, “किस बाई किस दोडका किस, दोडक्‍याची फोड लागते गोड’,झिम पोरी झिम अशी अनेक गाण्यांवर महिलांनी खेळ खेळून मंगळागौर साजरा केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या उपाध्यक्ष संगीता खटावकर,उपसचिव अश्विनी पळसे,उपखजिनदार सुषमा बुधे,सल्लागार रतन वीरकर,सदस्य राजश्री भादेकर, सुजाता भांड, ज्योती कवितके, मनीषा शेळके,शीतल डफळ,रीचा कुलाळ, सीमा कुरकुंडे,अनिता धानापुणे,अर्चना धानापुणे तसेच धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थेचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, कार्याध्यक्ष महेश गुंड,सल्लागार प्रसाद वारे, कार्यकारणी सदस्य गणेश बारगीर,सुरेश भांड,प्रशांत वारे,गजानन वारे,दिनकर कापडी,योगेश कुरकुंडे,उत्तम गावडे आदींनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]