भीमटेकडी ( छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद))- विशेष प्रतिनिधी
परम पूज्यनीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण त्यांच्या अनुयायी यांना नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा १४ऑक्टोबआर १९५६ ला दिली तेव्हा पासून आपण सर्वजण बौद्ध झालो. देशातील बाबासाहेब आंबेडकर यांना मानणार समाज आणि जाती च्या समुदायांनी बौद्ध धम्म स्वीकारला स्वीकारत आहेत. कुठल्याही जातीच्या जनतेनी बौद्ध धम्म स्वीकारला तर पूर्वाश्रमीची कुठलीही जात असली तर ती गृहीत न धरता आता सगळे आपण बौद्ध म्हणून आपसात रोटी बेटी व्यवहार झाला पाहिजे असे मत लातूर लोकसभेचे माजी लोकप्रिय संसदरत्न खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी त्यांच्या परिवाराच्या वतीने केलेल्या धम्मदान प्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या ५ मे २०२३ च्या जयंती उत्सव कार्यक्रमाच्या बुद्धिस्ट फेस्टिवल च्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
आज बुद्ध पोर्णिमा निमित्य महाउपासक डॉ अनिलकुमार बळीराम गायकवाड मा.सचिव सा.बा.विभाग मंत्रालय मुंबई,यांनी छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद) येथील भीमटेकडी या बुद्ध विहाराकडे जाणारा रस्ता डाबरीकरण करुन दिला. त्या रस्त्याचे लोकार्पण आणि भगवान गौतम बुद्धाची मूर्ती प्रतिष्ठापना त्यांचे बंधु लातूर चे लोकप्रिय मा.खासदार प्रोफ़ेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. भीमटेकडी च्या ११० एकर परिसरात १०० बेड चे हॉस्पिटल चे भूमीपूजन ही गायकवाड साहेबांच्या हस्ते करण्यात आले.आयपीएडी/ओपीडी चे ही उद्घाटन ही हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या संयोजिका पुज्यनीय माताजी भिक्खुनी प्राध्यापक धम्मदर्शना महाथेरी यांनी आमच्या बळीराम गायकवाड परिवाराचे दान बद्दल कौतुक करुन परिवाराला आशीर्वाद दिला आणि आभार ही व्यक्त केल्या.कार्यक्रमाला विनायक घनबहादुर ,मूर्ती दान दिलेल्या शोभाताई कोल्हे,विश्व दलित परिषद चे ऍड.शिरिन वारे,ऍड.संजय घागरे,उद्योजक राजवेंद्र गुट्टे,ज्योती दांडगे,संगीता सावंत, डॉ बाबासाहेब वाघमारे,डॉ सोनवणे मॅडम,भिक्खुनी संघ,श्रमानेर संघ,बौद्ध उपासक उपासिका मोठया संख्येनी उपस्थित होते.





