आज भारत अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण तर झाला आहेच इतर देशांना तो धान्य निर्यात करतो! – डॉ. संदीप जगदाळे
लातूर…दयानंद कला महाविद्यालय संशोधन विभागाच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा, विद्यापीठ नांदेड अधिसभेचे सदस्य डॉ. संदीप जगदाळे यांचे ” स्वातंत्र्याची 75 वर्षे : उपलब्धी आणि आव्हाने ” या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रस्तविक मांडताना डॉ. सुनीता सांगोले यांनी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, तर नैतिकतेने वागणे महत्त्वाचे असते. आज आपल्या समाज जीवनाची प्रत्येक क्षेत्रे दुर्दैवाने बाधीत झाली आहेत. निर्भयपणे, तटस्थपणे आपल्याला ‘लिहिता’ येत नाही. ‘सत्य’ बोलता येत नाही. स्वातंत्र्याचा संकोच होतो आहे. पण त्याविषयी ‘उच्चार’ करण्याचे सामर्थ्य आपण दाखवत नाही. याबद्दल खंत व्यक्त केली. मिळालेले स्वातंत्र्य त्यामागील समर्पण आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठीची आपली जबाबदारी विद्यार्थ्यांना कळावी या उद्देशाने हे व्याख्यान आयोजित केले. अशी प्रास्तविकपर भुमिका विशद केली. डॉ संदीप जगदाळे यांनी भारताची परंपरा, स्वातंत्र्यपूर्व भारत आणि आजचा भारत असा आलेख पीपीटीच्या माध्यमातुन दाखवला.
१९४७-८० मधील भारताचा सरासरी आर्थिक विकासदर हा भारताबरोबरच स्वतंत्र झालेल्या बाकी अशियाई देशांपेक्षा बराच कमी होता. पण गेल्या वर्षी भारतात थेट परकीय गुंतवणुकीने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले. गेल्या वर्षी भारतात एफडीआय मध्ये अठरा टक्के वृद्धी झाली आहे.म्हणूनच कोरोना काळातही जगातल्या मोठ्या कंपन्या भारताकडे वळत आहेत. भारताने कृषी/अन्नधान्य याबाबतीत तंत्रज्ञानाचा वापर करत प्रगती साधली. भारत आज अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे!
आज साऱ्या जगाची तहानभूक भागवण्यासाठी धान्य इतर देशांना निर्यात करतो!पृथ्वीचे निरीक्षण, पृथ्वीवरील साधनसामग्री, हवामान, अवकाशातील दीर्घकालीन वास्तव्य, दळणवळण या बाबतीत भारताने आश्चर्यकारक प्रगती केली आहे. भारताच्या या प्रगतीमुळे भारत महासत्ता होईल की कायम अशी भीती अनेक महासात्ताना वाटू लागली आहे. अशा प्रकारचे मत प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी आपला देश विविधतेने नटलेला आहे. अनेक जाती, धर्म, पंथ येथे आहेत. पण धर्मनिरपेक्षता अजून रुजली नाही याची उदाहरणे दिली. समतावादी लोकशाही’ हे बोलायला छान वाटतं; पण आम्हाला अजूनही ‘जुने’ त्यागता आलेले नाही. धर्मनिरपेक्षतेसाठी समाजाची पुनर्रचना करणे आवश्यक आहे, नवी मूल्ये स्वीकारणे, रुजवणे आवश्यक आहे असे मत प्रतिपादन केले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघराज शेवाळे आणि आभार प्रदर्शन प्रा. विवेक झम्पले यांनी केले. प्राध्यापक, विदयार्थी यांच्या उत्तम प्रतिसादात व्याख्यान संपन्न झाले.


