कोळ्ळी गल्लीतील नळाला पाणीचं येईना ; त्यात सततचा वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण..
नळाला पाणी नसल्याने महिलांचा टाहो…
निलंगा,-( प्रशांत साळुंके )- निलंगा तालुक्यातील निटूर या कोळ्ळी गल्लीतील नळाला पाणीचं येत नसल्याने नागरिक,महिला,बालगोपाळासह नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे.त्यामुळे तात्काळ सार्वजनिक नळाव्दारे पाणी सोडण्यासाठी याचे योग्य नियोजन करून वेगळी पाईपलाईन टाकण्याची मागणी ग्रामस्थ करित आहे.
निलंगा तालुक्यातील निटूर गावाची लोकसंख्या अंदाजे सोळा हजाराच्या घरात असताना पाण्यासोबत विजपुरवठा खंडीत सतत होत असल्याने याकडे सबंधितांचे लक्ष नसल्याने हा प्रकार घडत आहे.वेताळावरच्या डी.पी.( डिफाॅल्ट ) व्दारे विजग्राहक कनेक्शन असल्याने याठिकाणाहुन सतत विजपुरवठा खंडीत होत असल्याने कसलाच सुरूळीतपणा होत नसल्याने नागरिकांना सुविधेपासून दूरचं…माञ,आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे.कारण,डासोत्त्पती जास्तप्रमाणात जाणवत असल्याने हा प्रकार आहे.
एकंदर,याभागात पाणी,विज,डासोपत्त्पती याचा मोठ्याप्रमाणात उच्छाद वाढल्याने सर्वसामान्यांना वालीच राहीला नाही.म्हणून,वेगळी पाईपलाईन देऊन आपले कर्तव्य करावे,अशी मागणी याभागातील पाणीग्राहक करित आहेत.तसेच,सततचा विजपुरवठा खंडीत होत असल्याने याकडे तात्काळ लक्ष देऊन सुरूळीत करण्यात यावी,अशीही मागणी याभागातील नागरिक करित आहेत.
निटूर येथील कोळ्ळी गल्लीभागात नळाला पाणी येत नसल्याने नागरिक आणि महिलांचा टाहो पाहावयास मिळाला.याकडे सबंधिताचे लक्ष नसल्याने याभागाची पहिल्यापासून दयनिय अवस्था लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून पाहावयास मिळत आहे.त्यामुळे लोकप्रतिनिधीवर याभागातील नागरिक सोयी-सुविधा नसल्याने नाराजी व्यक्त करित आहेत.तसेच,कांही पाणीग्राहक आणि घरग्राहक सतत पट्टी भरण्यात व्यस्त असतात त्यांना सुविधा नसल्याने नाहाक ञास सहन करावा लागत आहे.म्हणून,संबंधितानी याकडे लक्ष देऊन नियोजन करून सोयी – सुविधा देण्याची मागणी करित आहेत.











