23 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeलेख*नवरात्रीला नवा आयाम देणारे स्वरूपाताई आणि संतोषदादा!*

*नवरात्रीला नवा आयाम देणारे स्वरूपाताई आणि संतोषदादा!*

व्याप कुणाच्या मागे नाही. घर,संसार, घरी सासू मोठ्या आजारपणातुन जातेय. शाळेचा व्याप मोठा. घरात पाहुणे येण्याचे प्रमाण कमालीचे वाढलेले. त्यात नवरात्र. घरातील कुलधर्म कुलाचार. दिवसाचे 24 तास कमी पडतात.

अशा परिस्थितीत मनात समाजातील उपेक्षित वर्गातील मुलींसाठी काही करणे. त्यासाठीचा बराच वेळ काढणे. सोबतच त्यासाठी मोठा खर्च करण्याची तयारी असणे.हे सर्व करताना चेहऱ्यावरील हास्य आणि अंगीभूत अशी कमालीची ऊर्जा. हे सगळे मनात कुठे तरी दुर्देम्य इच्छा शक्ती असल्या शिवाय शक्य नसते.

मी वरील सगळे वर्णन करतोय ते स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका स्वरूपाताई संतोष कुलकर्णी यांचे. आज नवरात्रातील अष्टमी. अंबाजोगाईची देवी योगेश्वरी कुमारिका देवी. नवरात्रात कुमारिकांची पूजा करून भेट वस्तू द्यायची असते. स्वरूपाताई आणि संतोषदादांनी ठरवले की वस्तीवरील सर्व जातीधर्माच्या मुलींना नवीन कपडे घ्यायचे आणि ते ही मुलींच्या पसंतीने. एक दोन नाही तर चांगल्या पंधरा कुमारिका. शीख,मुस्लिम,कोसावी,कानडी अशा विविध समाजाच्या ह्या मुली. काही तर आपल्या पसंतीने पहिल्यांदाच कपडे घेत होत्या. ओंकार परिधानच्या मालकांनी खूप मदत केली.

स्वरूपाताई व संतोषदादा तुम्ही या वर्षीच्या नवरात्रीला एक नवा आयाम दिला. ईश्वरोपासना करतानाच माणसात देव पाहण्याची स्वामी विवेकानंदांची शिकवण तुम्ही प्रत्यक्ष जीवनात उतरवत आहात !!

प्रसाद चिक्षे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]