लातूर दि.14-02-2023
जगात सर्वाधिक हुशार तरूण भारत देशात आहेत आणि सुशिक्षीत बेकारीचीही संख्या आपल्याच देशात आहे. याचे मूळ कारण म्हणजे येथील राज्यकर्त्याची उदासिनता ही बाबत लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 34 वर्षानंतर नवीन सीबीसीएस शिक्षण पद्धती आणली. यामुळे शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला. अध्यात्म, विज्ञान, व्यावसायिकता व योगा याला या शिक्षण पध्दतीमध्ये प्राधान्य देण्यात आलेले आहे. जगाच्या तुलनेत भारताची चौफेर प्रगती झाल्यामुळे जी-20 चे अध्यक्ष पद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मिळाले. यापूर्वी जगात सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून बराक ओबामा यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु आता जगात 78 टक्के जनतेने सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून मोदींना प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे जगाातील 13 राष्ट्रांनी मोदीजींचा सर्वोच्च पदक देऊन गौरव केलेला आहे. यामध्ये प्राधान्याने तीन मुस्लीम राष्ट्रांचा समावेश असल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारतीय तरूण जगात प्रभावशाली ठरतील असे अभ्यासपूर्ण, प्रभावी विचार शैक्षणिक व विविध विषयाचे अभ्यासक माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मांडले.
यावेळी ते जेएसपीएम संचलित शिवाजी विद्यालय, बिटरगाव ता.रेणापूर या विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन-2023 ,विज्ञान प्रयोगशाळा उद्घाटन व विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाला जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, संस्थेचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, समन्वयक विनोद जाधव, एम.एन.एस. बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, जेएसपीएम संस्थेचे संचालक आप्पासाहेब पाटील, मुख्याध्यापक मोहन खुरदळे, बिटरगावचे सरपंच महेंद्र पाटील, मेघराज देशमुख, बिटरगाव विविध कार्यकारी सोसायटीचे व्हा.चेअरमन अमर वाकडे, टाकळगावचे सरपंच आश्रूबा चोरमले, मधुकरराव देशमुख, सूर्यकांतराव मुंडे, सुमठाण्याचे सरपंच विठ्ठलराव साखरे, जिल्हा परिषदे शाळेचे मुख्याध्यापक साळी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, जेएसपीएम संस्थेची स्थापना 1983 मध्ये झाली असून संस्थेने पुणे, औरंगाबाद, लातूर या शहरामध्ये 32 युनिटची उभारणी केली असून 1100 कर्मचार्यांच्या माध्यमातून 20 हजार विद्यार्थी घडविण्याचे काम करीत आहेत. या संस्थेचा एक भाग म्हणून जेएसपीएम संचलित शिवाजी विद्यालयाच्या माध्यमातून अध्यात्म, विज्ञान व उद्योगाद्वारे तेजस्वी विद्यार्थी घडविण्याचे काम सुरू आहे. या भागातील विद्यार्थी व पालकांचा कल लक्षात घेऊन चालू वर्षापासून ज्युनियर कॉलेज सुरू करण्याचा संकल्प आहे. खर्या अर्थाने या भागातील शैक्षणिक विकास घडवून बिटरगावच्या शिवाजी विद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे केंद्र बनेल ते यावेळी बोलताना म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदुनाथ यादव यांनी केले तर आभार जी.एम.जाधव यांनी मानले. सांस्कृतिक कार्यक्रमाने विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाला गाव व परिसरातील विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शिक्षणाला अध्यात्म व विज्ञानाची जोड देऊन अध्यापनाचे काम करावे
– अजितसिंह पाटील कव्हेकर
जेएसपीएम संस्थेच्या माध्यमातून अध्यात्म, विज्ञान व व्यावसायीकतेवर आधारित शिक्षणातून तेजस्वी विद्यार्थी घडविण्याचे काम आपण गेल्या 40 वर्षापासून करीत आहोत. नुकतेच 41 व्या वर्षात संस्थेचे पदार्पन झालेले आहे. या संस्थेअंतर्गत बिटरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे विद्यालय सुरू आहे. प्रत्येकाला वाटते या विद्यालयातून आपला मुलगा डॉक्टर, इंजिनियर झाला पाहिजे, पंरतु त्याबरोबरच त्याला संस्काराची जोड मिळण्यासाठी अध्यात्म, विज्ञान व व्यावसायीकता त्यांच्या अंगी रूजविणे गरजेचे आहे. त्यामुळे या विद्यालयातील शिक्षकांनी शिक्षणाला विज्ञानाची जोड देवून अध्यापणाचे काम करावे जेणेकरून विद्यार्थी सुसंस्कारीत होतील असे प्रतिपादन जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष तथा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.
—————————————————




