लातूरकरांच्या हितासाठी शहर भाजपा मनपा आयुक्तांच्या दालनातविविध समस्या सोडवण्यासाठी दिले सुचनावजा निवेदन
लातूर ;(प्रतिनिधी ) – लातूर शहर महानगरपालिकेत सद्या प्रशासकराज असल्याने अनेक समस्यांचे निराकरण होत नाही. त्याचबरोबर मुलभूत सुविधा मिळण्यात सुद्धा मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळेच लातूरकरांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी आणि लातूरकरांच्या हितासाठी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ आज दि. ०७ जुलै रोजी मनपा आयुक्तांच्या दालनात जाऊन धडकले. यावेळी शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त मानसी मीना यांना सुचनावजा निवेदन दिले. याबाबत आयुक्त मीना यांनी या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही भाजप शिष्टमंडळाला दिली.

लातूर शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नसल्यामुळे शहराच्या विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे पाहण्यास मिळत आहेत. नाली सफाई वेळेवर होत नसल्यामुळे त्या तुंबल्या जात आहेत. शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नाही. ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण होत नाही. याप्रकारच्या कचरा व्यवस्थापनाबाबतच्या विविध समस्या असल्याचे निदर्शनास आणून देत भाजपाच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना याबाबत वेगवेगळ्या सुचना केल्या. कचरा व्यवस्थापनासाठी ज्यांना निविदा देण्यात आली आहे त्यांच्या कामावर मनपा प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी देखरेख होणे आवश्यक असल्याचेही शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी आयुक्तांना सांगितले आहे.
शहराच्या विविध भागांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालय सुरु केलेली आहेत. मात्र यापैकी काही शौचालय बंद असल्याचे लक्षात आणून देत बहुतांश शौचालयांची स्वच्छताही योग्य प्रकारे होत नसल्याचे आयुक्तांना सांगण्यात आले. त्यामुळे या कामासाठी ज्यांना निविदा देण्यात आली आहे त्यांना सुचना देऊन या शौचालयांची वेळोवेळी मनपाच्या स्वच्छता निरीक्षकांकडून पाहणी करण्याच्या सुचनाही यावेळी देण्यात आल्या.

शहरात मनपाने वाहन टोईंग करण्यासाठी ज्यांना निविदा देण्यात आली होती त्यांची मुदत संपलेली असली तरी त्यांना मुदतवाढ दिली असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांच्याकडून दंड आकारण्यात समानता नसल्याचे सांगितले. या कामासाठी जी माणसे नियुक्त करण्यात आली आहेत त्यांना ड्रेसकोड नाही तसेच त्यांच्याकडे कोणतीही आयडी सुद्धा नाही. त्याचबरोबर या माणसांकडून नेहमीच अर्वाच्च व शिवराळ भाषेचा वापर होत असल्यामुळे अनेकवेळा वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. यावर मनपाने योग्य कार्यवाही करून या कामाकरिता लवकरच नवीन निविदा प्रक्रिया पुर्ण करावी आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी व शर्ती लातूकरांनाही ज्ञात करून द्याव्यात अशी सुचना आयुक्तांना देण्यात आली. सद्या पावसाळ्याचे दिवस असून साथी रोगांचा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने तात्काळ धूर फवारणी, अॅबेटींग मोहीम सुरु करून यामध्ये शाळा व रुग्णालयाच्या परिसरास प्राधान्य द्यावे असे सूचित केले. यासोबतच रस्त्यांची दुरुस्ती वेळोवेळी व्हावी याकरीता आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावे अशी मागणी शहर जिल्हा भाजपच्या वतीने करण्यात आली.
लातूरकरांच्या हितासाठी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने याप्रसंगी मनपा आयुक्त मानसी मीना यांना सुचनावजा निवेदन दिले. या सर्व समस्या सोडवण्यासाठी मनपा आयुक्तांनी तात्काळ प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासित करून यातील विवीध प्रश्न सोडवण्यासाठी आपण जातीने लक्ष घालू असा विश्वास आयुक्त मानसी मीना यांनी दिला.
मनपा आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी जिल्हाध्यक्ष देविदास काळे, अविनाश कोळी, सरचिटणीस अॅड. प्रदिप मोरे, अॅड. दिग्विजय काथवटे, प्रवीण सावंत, मंडल अध्यक्ष सचिन सुरवसे, गोपाळ वांगे, सुरेश जाधव, विशाल हावा पाटील, रोहीत पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा सौ.रागिणी ताई यादव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अॅड. गणेश गोमचाळे, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश सचिव मुन्ना हाश्मी, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष मोहसीन शेख, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष निखील गायकवाड, माजी नगरसेवक राजू अवस्कर, अनंत गायकवाड, संजय रंदाळे, सुनील मलवाड, मंगेश बिराजदार, विशाल जाधव, श्वेता लोंढे, स्वाती घोरपडे, अर्चना आल्टे, महेश कौळखेरे, श्रीकांत रांजणकर, धनंजय हाके, अॅड. विजय आवचारे, आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी गाडेकर, भटके विमुक्त जाती प्रदेश सचिव रविशंकर लवटे, डॉ.नागोराव बोरगावकर, अॅड. ललित तोष्णीवाल, संजय गीर, प्रमोद गुडे, सतीश ठाकूर, अमोल गित्ते, ज्योतिराम चिवडे, अॅड. गणेश गोजमगुंडे, गौरव मदने, विनय जाकते, व्यंकटेश कुलकर्णी, मोहीत पाटील, अॅड. किशोर शिंदे, पंकज शिंदे, गणेश हेड्डा, महेश झंवर, मधुसूदन पारीख, भीमाशंकर गाडवे, नितीन लोखंडे, संतोष तिवारी, अभिजीत मुनाळे, प्रवीण येळे, संतोष पांचाळ, हेमंत जाधव, संगमेश्वर स्वामी, अजय भूमकर, विपुल गोजमगुंडे, श्यामसुंदर मानधना, लक्ष्मीकांत खरटमोल, सुवर्णा येलाले, गोविंद सुर्यवंशी, अरुण जाधव, गणेश राठोड, शांतीलाल शर्मा, किशन बडगीरे, किशोर जैन, सोमनाथ मेंदगे, भालचंद्र दानाई, वैभव वनारसे, पृथ्वीसिंह बायस, शशिकांत बिराजदार, शशिकांत हांडे, शिवशक्ती वाघे, सचिन मदने, वसीम पठाण, भरत लोंढे, गोपाळ ओझा, निखील शेटकार, राजश्री धोत्रे, अंकित बाहेती, दुर्गेश चव्हाण, गजेंद्र बोकन, नागेश जावळे, बालाजी मारकडे, सुमन राठोड, अॅड. शितल पाटील, हेमा येळे, सीमा करपे, मिनाताई गायकवाड, रोहिणी देशमुख, शितल कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, सागर घोडके, राजेश पवार, आकाश पिटले, श्रीनिवास मेनकुदळे, राजन सोनवणे, किशोर कवडे, रंगराव बंडगर, नयुम शेख, राजश्री बाहेती, प्रीतम मुंडलिक, सचिन जाधव, अबेद अली सय्यद, वैभव कांबळे आदि पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.





