ना. अमित देशमुख यांची ग्वाही

0
244

 

औरंगाबाद जिल्ह्यातील विकास प्रक्रिया गतीमान ठेवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल

ना. अमित विलासराव देशमुख यांची ग्वाही 

मुंबई दि २७ जुलै (प्रतिनिधी):औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे संपर्कमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज मुंबई येथे जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यां समवेत आढावा बैठक घेतली. बैठकीदरम्यान पक्षांतर्गत विषयांबरोबरच जिल्ह्यातील विविध विकास कामांचीही चर्चा करण्यात आली.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण संस्कृती कार्य मंत्री ना.अमित विलासराव देशमुख हे औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे संपर्क मंत्रीही आहेत. त्यांनी नुकताच औरंगाबाद जिल्हा दौरा केला होता, या दौऱ्यात त्यांनी पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत व्यापक बैठका घेतल्या होत्या. या बैठकीत ठरल्याप्रमाणे आज जिल्ह्यातील विविध विषय घेऊन काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मुंबईत आले होते. त्यांच्यासमवेत ना. देशमुख यांनी विषयनिहाय सविस्तर चर्चा केली, जिल्ह्यातील पक्ष वाढीबरोबरच विविध विकास कामाच्या बाबतीतही सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी दिली.

आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.या निवडणुकांची पक्षपातळीवर तयारी करावी, बूथ कमिट्या मजबूत कराव्यात, पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात, यात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, तरुण कार्यकर्त्यांना पक्ष कार्यात सहभागी करून घेऊन त्यांना पक्षाच्या ध्येय-धोरणांची माहिती करून द्यावी.

राज्य शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या लोकोपयोगी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. अशा सूचनाही यावेळी ना. देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

 

ना . देशमुख यांनी यावेळी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेऊन त्यासंदर्भातील अडचणी समजून घेतल्या, त्या सोडवण्यासाठी संबंधित विभागाकडे तसेच मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी दिली.

सदरील बैठकीस औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॅा.कल्याण काळे, आमदार राजेश राठोड, अनु.जाती विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॅा.जितेंद्र देहाडे, किरण पाटील डोणगावकर, भाऊसाहेब जगताप, अनिल सोनवणे, विनोद तांबे, भास्कर घायवट, अनिल श्रीखंडे, कमर भाई, संदिप बोरसे, अतिष पितळे, गौरव जैस्वाल, जयप्रकाश नारनवरे, कैसर यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here