25.2 C
Pune
Thursday, December 18, 2025
Homeठळक बातम्यानिटूर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह

निटूर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह

निटूर येथील श्रध्दास्थान ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिरात अखंड हरिनाम व शिवकथा सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास भाविक-भक्तांची मांदियाळी..

प्रवेशव्दाराच्या मनोर्‍याच्या सुशोभिकरणाने आकर्षण वाढले

निलंगा,-( प्रतिनिधी )-

निलंगा तालुक्यातील निटूर येथील श्रध्दास्थान ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिरात यंदा दोन वर्षानंतर अखंड हरिनाम व शिवकथा सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात दि.26 एप्रिल-3 मे पर्यंत सुश्राव्य किर्तनकारामुळे यंदाचा सप्ताहा भाविक-भक्तांना सांप्रदायिकतेच्या परंपरेला ऊर्जा देणारा होत आहे.
ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिरात सप्ताह्यामध्ये 24 तास विनेकरीची परंपरा अखंडीत आहे.तसेच,रोज नित्यनियमाने काकडा,ज्ञानेश्वरी पारायण,शिवकथेमुळे भाविक-भक्तांची मांदियाळी याठिकाणी मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे.तसेच,गायनकार,मृृदंगवादक,संगीतवादक,भजनीमंडळ,टाळकरी यांच्या संचामुळे मंदिरात तब्बल अखंड सप्ताह्यामुळे निटूरमध्ये सांप्रदायिकतेला महत्त्व आहे.


अखंड हरिनाम व शिवकथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात भक्तांनी सकाळचा नाष्टा,दूपारची पंगत,संध्याकाळची पंगत अशा पध्दतीने परंपरागत ठेवा जपत सेवाभाव म्हणून भाविकांसाठी प्रसादरूपी अन्नदान करण्यात येते.
गेल्या तीन वर्षापासून विश्वस्त समितीतील प्राचार्य प्रा.अनिल सोमवंशी,पंकज कुलकर्णी,विजयकुमार देशमुख,बाळकृृष्ण डांगे,वामन जाधव,दिनकर निटूरे अन्य सदस्यांनी दिवस-राञ करून उंच टेकडीवर असणार्‍या मंदिराचा कायापालट करून निटूर व परिसरातील भाविक-भक्तांना धार्मिकतेचा वसा आणि वारसा जपत मंदिरातील सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे.


एकंदर,मंदिरात आकर्षण वाढणारे प्रवेशव्दारातील चौ-बाजूंनी मनोर्‍याचे काम भव्य-दिव्य अशा स्वरूपात झाल्याने आखणीन भर पडली आहे.शिखरावर विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघाले आहे.पुठील किर्तनकाराच्या सेवेसाठी निटूर व पंचक्रोशीतील भाविक-भक्तांनी हजेरी लावावी असे विश्वस्त समिती व गांवकर्‍यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]