तपोनिधी सांब स्वामी महाराज जन्मोत्सवानिमित्त विविध उपक्रम
निलंगा,-( प्रशांत साळुंके)-
निलंगा तालुक्यातील निटूर येथे थोरले तपोनिधी सांब स्वामी महाराज यांच्या १३२ व्या जन्मोत्सवानिमित्त सोमवार दि.७ विविध धार्मिक विधी व विविध उपक्रमांचे आयोजन येथील जागृत असलेल्या सोमेश्वर ( महादेव) मंदिरात करण्यात आले आहे.मुळ निटूर येथील
तपोनिधी सांब स्वामी महाराज यांच्यावर भाव ,भक्ती व श्रद्धा असलेले शिष्य मराठवाड्यासह कर्नाटक राज्यात देखील आहेत.निटूर येथील सोमेश्वर मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी तपोनिधी सांब स्वामी महाराज यांचा जन्मोत्सव ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
आज सोमवारी दि.७ सकाळी वाजता महादेव मंदिरात द्वितीय सांब स्वामी महाराजांचा रुद्राभिषेक होऊन अकरा वाजता महाराजांचा पाळना होऊन गावातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत मिरवणुक निघुन द्वीतीय सांब स्वामी महाराज यांच आशीर्वचन होणार आहे.कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व भाविक भक्ताना महाप्रसादाचे वाटप करून जन्मोत्सवाची सांगता होनार आहे. कार्यक्रमाचा लाभ सर्व भावीक भक्तानी घ्यावा असे आवाहन जन्मोत्सव समितीचा वतीने कांताआप्पा बुडगे ,विठ्ठल डांगे,प्रभुअप्पा बोळेगावे,अजित मठपती,शाम मठपती परमेश्वर बुडगे,बालाजी आंबेगावे, शिवमुर्ती बुडगे, विठ्ठल बुडगे,राजाभाऊ सोनी यांनी केले आहे.




