निलंगा तालुक्यातील मसलगा येथील अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रेनफोर्स्ड काँन्क्रीट (UHPFRC) तंत्रज्ञानाने बांधण्यात आलेल्या देशातील पहिल्या वैशिष्ट्यपूर्ण पुलाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाहणी केली..
निलंगा,- ( प्रशांत साळुंके )-जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक { 752 } मसलगा { सोळ } नदीशेजारील मार्गावरील मलेशियन डयुरा उच्चतंञज्ञानाने बनविलेल्या पुलाची निर्मिती 16 पिलर्सव्दारे याठिकाणी बनविण्यात आले आहे.पुलाचे लोकार्पण सोहळा व पाहणी करण्यासाठी केंद्रीयमंञी नितीन गडकरी यांची उपस्थिती होती.
केंद्रियमंञी नितीन गडकरी यांना पाहणी दरम्यान संबंधितांनी विस्तृृृत माहिती दिली ती अशी देशातील पहिला पुल असल्याने त्याची साईज १११ मीटर लांबी व १६ मीटर रुंदीचा हा पुल या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ५५.५० मीटर लांबीच्या २ स्पॅनच्या बांधणीतून तयार करण्यात आला आहे. सदर वैशिष्ट्यपूर्ण पुलामध्ये लोखंडी सळ्यांऐवजी यूएचपीएफआरसी स्टील फायबर असलेले गर्डर वापरले जात असल्याने हा पुल अधिक मजबूत आहे. शिवाय हे गर्डर वजनाने हलके असल्याने पुलाच्या कामात सुलभ हाताळणी होते व बांधकाम जलद गतीने पूर्ण केले जाऊ शकते.

तसेच हा पुल अभेद्य, गंजरोधक आणि कार्बन व पाणी प्रतिरोधक असल्याने जास्त टिकाऊ आहे. विशेष म्हणजे नवीन तंत्रज्ञानाने निर्मित या पुलाच्या पायाच्या प्रकारानुसार बांधकामासाठी लागणाऱ्या खर्चातही १५ ते २५ टक्क्यांनी कपात होते.
दीर्घ कालावधीच्या पुलाच्या बांधकामासाठी इतर देशांमध्ये अनेक वर्षांपासून वापरले जाणारे हे प्रगत तंत्रज्ञान पर्यावरणपुरक व शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सर्व क्षेत्रांत अधिक शाश्वत उपायांसाठी व नवीन शोध व तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी इतर देशातील यशस्वी तंत्रज्ञानाचा स्वीकार करून अवलंब करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ‘एसडीपीएल’ने भारतात दीर्घ कालावधीच्या पुलांच्या बांधकामासाठी या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे.

याप्रसंगी,राज्यमंञी संजय बनसोडे,आ.विक्रम काळे,भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,अशोक शिंदे,जनार्धन सोमवंशी,बालाजी मोगरगे आदी जणांची उपस्थिती होती.











