29.5 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeसामाजिक*निलंगा तालुक्यातील निटूर मार्गे अनेक बस बंद असल्याने प्रवाशांची तारांबळ*

*निलंगा तालुक्यातील निटूर मार्गे अनेक बस बंद असल्याने प्रवाशांची तारांबळ*

निलंगा-( प्रतिनिधी )-निलंगा तालुक्यातील निटूर गाव जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (752) वर असलेले गाव माञ अलिकडच्या कालावधीमध्ये अनेक बसेस निटूर मार्गे बंद असल्याने प्रवाशी,विद्यार्थी,वयोवृृध्दांची तारांबळ उडत आहे त्यामुळे मागील काळातील बसेस पूर्ववत चालू करण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.
निटूरहुन प्रवास करणार्‍यांची संख्या मोठ्याप्रमाणात असल्याने याठिकाणाहुन शिरूर अनंतपाळ मार्गे नांदेड आणि लातूरला जाण्यासाठी प्रवाशांची एकच तारांबळ उडत आहे त्यामुळे येथील शाळा,महाविद्यालय,बॅंकेच्या व्यवहारासाठी, प्रशासकीय कार्यालय याकरिता प्रवास करण्यासाठी निटूरमध्ये जास्त संख्या वाढत असल्याने येथे बसेस वाढवणे आवश्यक आहे.
जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्गावर असलेले निटूर गाव बाजारपेठेत निलंगा तालुक्यात दुसरे स्थान असल्याने निलंगा आगार, उदगीर आगार आणि लातूर आगाराने बसेस वाढवण्यासाठी प्रयत्नशिल असणे गरजेचे आहे.कारण, येथे प्रवाशांची संख्या पाहता बसेसचीही संख्या वाढवणे आवश्यक आहे.त्यामुळे प्रवाशांच्या सुखासाठी तरी आगार प्रमुखांनी दखल घेवून बसेस चालू कराव्यात अशी मागणी जोर धरित आहे.
अनेक वयोवृध्द प्रवाशांना अनेक तासन्र तास बस थांबा जवळच बसची वाट पाहत बसत असल्याने बसेसची संख्या वाढवण्याची मागणी वाढत आहे.सद्यस्थितीला उन्हाळ्याची चाहुल लागत असल्याने अनेक प्रवाशी ताटकळत बसची वाट बघत असताना दिसत आहेत.त्यामुळे तात्काळ निटूर मार्गे अनेक बसेस बंद केलेल्या पुर्ववत चालू करण्यात याव्यात अशी मागणी जोर धरत आहे.
एकंदर,निलंगा-निटूर-लातूर आणि लातूर-निटूर-निलंगा मार्गे असणार्‍या बसेस चालू करण्याची मागणी जोर धरीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]