केंद्रीयमंञी नितीन गडकरी यांनी माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटी दरम्यान यथोचित सत्कार..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-केंद्रीयमंञी नितीन गडकरी यांच्या लातूर दौर्यानिमित्त अनेक विविध विकासाच्या माध्यमातून कार्यक्रमासाठी आले असता माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या लातूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे.
केंद्रीय वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन विविध कार्यक्रमाला उपस्थिती लावून मार्गदर्शन केले. लातूर जिल्ह्यातील शेकडो कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या रोडचे , विदेशी टेक्नॉलॉजी वापरून बांधण्यात आलेले देशातील पहिल्या पुलाचे लोकार्पणआदरणीय गडकरी साहेबांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या निवासस्थानी भेट दिली त्यामुळे त्यांचा कौटुंबिक पद्धतीने यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी माजी खासदार आदरणीय रूपाताई पाटील निलंगेकर,भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र सचिव अरविंद भाऊ पाटील निलंगेकर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस माजी नगराध्यक्ष किरण उटगे, सत्यवान धुमाळ व कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.











