निलंगेकर यांचे विचार कव्हेकर पुढे नेत आहेत

0
348

 

निलंगेकर साहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम कव्हेकरांनी सुरू केले

– माजी कामगार कल्याण मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर  

लातूर दि.16/07/2021

राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे अकाली निधन झाले परंतु त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार पुढच्या पिढीला मिळावेत. या दृष्टिकोणातून माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी निलंगेकर साहेब यांच्या नावाने अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलेले आहे. यामुळे लातूर शहर व परिसरातील विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. खर्‍या अर्थाने या माध्यमातून माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम कव्हेकरांनी सुरू केलेले आहे, असे प्रतिपादन माजी कामगार कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.

यावेळी ते जेएसपीएम संस्थेच्यावतीने मजगे नगर येथील महाराष्ट्र विद्यालयात राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिका केंद्र व स्पर्धा परीक्षा केंद्राच्या सदिच्छा भेटी प्रसंगी बोलत होते.

यावेळी जेएसपीएम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार,समन्वयक बापुसाहेब गोरे, नगरसेवक बालाजी शेळके, जाफर पटेल, हेमंत जाधव, प्राचार्य मोहन खुरदळे, प्राचार्य गोविंद शिंदे, मु.अ. सुनिता मुचाटे, अरूणा कांदे, मु.अ.संजय बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, निलंगेकर साहेबांनी गुलबर्गा येथे चालत जाऊन शिक्षण पूर्ण केले होते. तीच शिदोरी घेऊन राज्याच्या राजकारणात सक्रिय होऊन राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्या विचाराची शिदोरी पुढेही कायम रहावी या दृष्टिकोणातून कव्हेकर साहेबांनी व अजितसिंह पाटील यांनी जेएसपीएम संस्थेंअतर्गत त्यांच्या नावाने महाराष्ट्र विद्यालयामध्ये अभ्यासिका व स्पर्धा परिक्षा केंद्र उभारलेले आहे. यामुळे या भागातील विद्यार्थ्यांचे सोय झालेली आहे. यामुळे या अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्रातून भविष्यात अनेक विद्यार्थी अधिकारी होतील, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केला.

प्रारंभी राज्यांचे माजी कामगार कल्याण मंत्री तथा माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा शिवप्रतिमा,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष तथा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अब्दुल गालिब शेख यांनी मानले.

निलंगेकर साहेब कर्मयोगी नेते होते

राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून कै.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांनी राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिलेले आहे. राज्यात वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, यांच्यासारखे नेते पाहिले. परंतु माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासारखे नेते पुन्हा होणे नाही. माणूसकी व कार्यभाव लक्षात घेऊन त्यांनी काम केले. स्व.दिलीपरावांच्या प्रचारात आपण महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. 70 गावात प्रचारयंत्रणा राबवून त्यांना निवडून आणण्यात सहभाग घेतला होता. काम केले. त्याच विचारावर संभाजीराव पाटील निलंगेकरांनीही राज्याच्या वाटचालीत योगदान देत आहेत, त्यामुळे खर्‍या अर्थाने निलंगेकर साहेब हे कर्मयोगी नेते होते, असे प्रतिपादन जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here