चापोली – चापोली ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच पार पाडली या निवडणुकीत निसार देशमुख हे सलग तिसऱ्यांदा वेगवेगळ्या प्रभागातून विजयी झाले असून त्यांच्या या निवडणुकीचा विशेष आढावा.
चापोली येथे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ज्यांच्याकडे प्रभारी सरपंच म्हणून पदभार होता ते निसार देशमुख हे सलग तिसऱ्यांदा ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. खरतर ग्रामपंचायत सदस्य हा दुसऱ्यांदा निवडणूक लढवत असताना तो परेशान असतो कारण त्याला सत्तेची अँटी इन्कमबसी झालेली असते परंतु निसार देशमुख हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवून ते जिंकून आले आहेत हे मात्र विशेष.
निसार देशमुख यांचे वडील इलास्मिया देशमुख हे चापोलीच्या राजकारण सक्रिय होते. त्यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसा आहे त्यांचे सुपुत्र निसार देशमुख हे चालवत आहे. निसार देशमुख यांनी पहिल्यांदा 2012 साली ग्रामपंचायत निवडणूक प्रभाग क्रमांक 02 मधून निवडणूक लढवली होती यामध्ये ते विजय संपादन केले होते. त्यानंतर त्यांनी 2017 साली प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढवली होती त्यामध्ये सुद्धा ते विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी यावेळेस शंकरवाडी व चापोली चा भाग समाविष्ट असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढवली यावेळीस ही ते जवळपास 150 च्या मताधिक्याने विजय झाले आहेत.
शंकरवाडी- चापोलीचा हा प्रभाग असलेल्या मतदारसंघात मुस्लिम मते ही फार नाही तरीही आणि मोठा धैर्य करून या मतदारसंघात निवडणूक लढवली व निवडणूक एकतर्फी जिंकली. या राजकीय धैर्यचे संबंध चाकूर तालुक्यातून कौतुक होत आहे. आगामी काळात शंकरवाडी सह चापोलीच्या या प्रभागाला एक मॉडेल बनवला असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे 2012 साली त्यांच्या प्रभागाचे तिन्ही सदस्य त्यांनी निवडून आणले, 2017 त्यांच्यासह दोन सदस्य त्यांनी निवडून आणले 2022 साली प्रभाग क्रमांक दोनचे तिन्ही सदस्य त्यांनी निवडून आणले आहेत. यामुळे एक वेगळा इतिहास चापोलीच्या राजकारणात निसार देशमुख यांच्या विजयामुळे लिहला गेल्याचे चित्र सध्या चापोली मध्ये आहे.
निसार देशमुख उपसरपंच पदाचे प्रमुख दावेदार
निसार देशमुख हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्यामुळे तसेच ग्रामविकास पॅनलच्या नऊ जागा आल्याने त्यांचे स्पष्ट बहुमत असल्या कारणामुळे त्यांच्याकडून निसार देशमुख हेच उपसरपंच पदाचे प्रमुख दावेदार असल्याची चर्चा सुद्धा चापोली करांमध्ये मोठ्या प्रमाणात रंगत आहे…




