विध्यार्ध्यानी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे
– निकेतन कदम, सहाय्यक पोलिस अधीक्षक
———————————————-
नेहरू युवा केंद्राच्या वतीने सरदार वल्लभाई पटेल जयंती साजरी व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण
———————————————
लातूर : विद्यार्थ्यांनी ध्येय्य निश्चित करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. आपआपल्या क्षेत्रामध्ये प्रत्येकांनी सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र लातूर च्या वतीने वडवळ नागनाथ (ता.चाकूर) येथील वटसिद्ध नागनाथ मंदिराच्या सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण व सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती कार्यक्रमात रविवार (दि.३१) रोजी सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी केले.
भारत सरकार च्या नेहरू युवा केंद्र लातूर च्या जिल्हा युवा समन्वयक साक्षी समैया, लेखाधिकारी संजय ममदापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत सरकारचे युवा पुरस्कार विजेते संगमेश्वर जनगावे, उद्धघाटक म्हणून लातूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब पाटील, रोटरी क्लब ऑफ चाकूर चे अध्यक्ष शिवदर्शन स्वामी, माहिती आय.टी.क्षेत्रातील तज्ञ कल्पेश पगारे, सरपंच मुरलीधर सोनकांबळे, माजी चेअरमन अच्युतराव गव्हाणे, संतोष आचावले, शिवशंकर टाक, राजकुमार मोहनाळे, परीक्षित ठाकूर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

यावेळी समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे यांनी सरदार वल्लभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत राजकारण्यांना दोष न देता यात बदल घडवण्यासाठी तरुण पुढीने राजकारणात यावे असे आव्हान केले. यावेळी या आण्णासाहेब पाटील, शिवदर्शन स्वामी, संगमेश्वर जनगावे यांनी मार्गदर्शन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरदार वल्लभाई पटेल यांच्या तेलचित्राचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. संस्कार कोचिंग क्लासेस चे संचालक सागर पांचाळ, नेहरू युवा केंद्र चाकूर तालुका समन्वयक प्रशांत साबणे, नागनाथ मुळे, राम सगर, किशोर गंदगे, विशाल जनगावे, कार्तीक किणगावकर, संदीप येवंदगे, सीताराम कांबळे आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती कोचिंग क्लासेस चे संचालक ईश्वर स्वामी यांनी केले.











