23.6 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeठळक बातम्यापंकजा मुंडे-पाशा पटेल भेट

पंकजा मुंडे-पाशा पटेल भेट

राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि पाशाभाई पटेल यांची भेट..

टिश्यु कल्चर लॅब लोदगा येथे भेट देण्यासाठी पंकजाताईंनी निमंञण स्विकारले..

निलंगा,-( प्रशांत साळुंके )- दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृृत्वाखाली भाजपात प्रवेश करून संपुर्ण राज्यभरात मुंडेंचा डंका वाजवणारे शेतकरी नेते पाशाभाई पटेल यांनी काल परळी येथे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची भेट घेतली.साहेबांच्या मुलीची भेट झाल्यानंतर पाशाभाईंनी आनंद व्यक्त केला.सद्यस्थितीला,देशभरात बाबुंच्या लागवडी संदर्भात सुरू असलेल्या कामाविषयी पंकजाताईंना माहिती दिली.लातूर जिल्ह्यातील लोदगा येथे उभारण्यात आलेल्या टिश्यु कल्चर लॅबला भेट देण्यासाठी ताईंनी निमंञण स्विकारल्याचे ते म्हणाले.या भेटीदरम्यान मुंडे घराण्याशी असलेले पाशाभाई पटेल यांचे रूणानुबंध आणखी वृृंध्दींगत होणार आहेत.
जवळपास वीस वर्षांपुर्वी पाशा पटेल यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला होता.याप्रवेशानंतर त्यांना राज्यभरात शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लढण्यासाठी पक्षाने ताकद दिली.प्रामुख्याने स्व.गोपीनाथराव मुंडे यांनीच पाशा पटेल हे नाव राष्ट्रीय पक्षाच्या व्यासपीठावर आणले.त्यांना विधानपरिषदेत संधी दिली.बीड जिल्ह्याच्या राजकारणात मुंडे यांची ताकद वाढवण्यासाठी पाशा पटेल यांनी दिलेले योगदान आजही लोक विसरलेले नाहीत.मध्यंतरीच्या काळात बांबु वृृृक्षलागवडीच्या संदर्भात,पाशा पटेल यांनी देशभरात एक मोठी चळवळ उभी केली.केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांच्या कल्पनेतील ही योजना प्रत्यक्ष शेतकरी आणि त्याच्या बांधापर्यंत घेवून जाण्यामध्ये पाशा पटेल आघाडीवर राहिले आहेत.याच कामाची माहिती देण्यासाठी त्यांनी काल परळी येथे भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची भेट घेतली.
बांबु लागवडी विषयीचे फायदे आणि पर्यावरणासाठी असलेले महत्त्व पाशा पटेल यांनी विशद केले.लोदगा येथे या संदर्भात सुरू असलेल्या कामा विषयी माहिती दिल्यानंतर पंकजाताईंनी लवकरच आपण याठिकाणी भेट देवू असे सांगितले.गेल्या वीस वर्षांपासून मुंडे कुटुंबाशी असलेले रूणानुबंध याभेटीमुळे आणखीन वृृध्दींगत होणार असून येणार्‍या काळात बांबु वृक्षलागवडीच्या अभियानात पंकजाताईंचे मोठे योगदान मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]