29.5 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeसांस्कृतिक*पंचगंगा मंदिर… महाबळेश्वर*

*पंचगंगा मंदिर… महाबळेश्वर*


महाबळेश्वरमधील पवित्र स्थानांपैकी एक पंचगंगा मंदिर आहे. कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच वेगवेगळ्या नद्यांमधून पाणी या ठिकाणी सामील होते.

पाच नद्यांच्या संगमाने पंचगंगा नाव दिले आहे जेथे पंच म्हणजे पाच आणि गंगा म्हणजे नदी. सर्व नद्या दगडांच्या बाहेर कोरलेल्या गायीच्या तोंडातून बाहेर येतात. अशाच जागेला पंचगंगा मंदिर असे म्हणतात.

हे प्रसिद्ध मंदिर राजा सिंघेदेव यांनी बांधले होते. ते 13 व्या शतकात देवगिरीचे यादव यांचे राजा होते. 16 व्या शतकात मराठा सम्राट शिवाजी यांनी मंदिर सुधारले.

महाबळेश्वर मधील या प्राचीन मंदिरातून कृष्णा नदीचा उगम झाला आहे.
महाबळेश्‍वर म्हणजे भूतलावरील स्वर्गच जणू. महाराष्ट्राचे नंदनवन व निसर्गाने परिपूर्ण भरलेलं आणि सह्याद्रीच्या उतुंग गिरिशिखरावर वसलेलं एक जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून महाबळेश्‍वर ला ओळखले जाते. याबरोबरच महाबळेश्‍वरची एक पवित्र तीर्थक्षेत्र व धार्मिक स्थळ म्हणून देखील पूर्वी पासून ओळख आहे. महाबळेश्‍वर पासून 6 किमी अंतरावर अद्वितीय निसर्गसौंदर्याचे देणे लाभलेला परिसर म्हणजे श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथे ऐतिहासिक वारसा लाभलेले पंचगंगा मंदिर आहे. या मंदिरात श्रावणी सोमवारी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात.

श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथे असलेल्या पंचगंगा मंदिरालाही ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. सुमारे 600 वर्षापूर्वीचे असलेले हे मंदिर पाच नद्यांचे उगमस्थान असून या मंदिरातून कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री व वेण्णा या नद्यांचा उगम झाला आहे. पुरातन कथेनुसार ब्रह्मा, विष्णू, महेश, सावित्री व गायत्री या देवतांचा येथून जलरुपात उगम झाला असल्याचेे म्हटले जाते. श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीस लाखो भाविक क्षेत्र महाबळेश्‍वरला भेट देतात.

सर्वांच्या मनोकामना, इच्छा पूर्ण होतात म्हणून आद्य शंकराचार्यांनी पाचही नद्या व श्री महाबळेश्‍वर यांच्याकडे खालील प्रार्थना केली.कृष्णा ईच्छित फल प्राप्त करो, वेण्णा आमच्या शत्रूंचा नाश करो व कोयना सुखकारक शंभर पुत्र देवो, सावित्री संपत्ती प्राप्त करून देवो व गायत्री ज्ञान प्राप्त करून देवो. त्याच प्रमाणे श्री महाबळेश्‍वर देव आमचे नेहमी रक्षण करो.

पंचगंगेचे मंदिर १७व्या शतकात बांधण्यात आले या ठिकाणी पाच नद्यांच्या मूळधारा उगम पावतात.कृष्णेच्या मूर्तीजवळ दर बारा वर्षांनी कन्यागत पर्वात उत्तरेकडून भागीरथी कृष्णेस भेटावयास येते ;तर दर साठ वर्षांनी कपिलाष्टीच्या योगावर सरस्वती नदी गायत्रीस भेटावयास येते हे पाच नद्यांचे प्रवाह कलाकृतीतून उगम स्थानांना एकत्र करुन ते पाणी गोमुखातून कुंडात सोडलेले आहे त्यास ब्रहकुंड म्हणतात. शेजारी विष्णूकुंडही आहे . याविष्णूकुंडात सात बहिणी गुप्त होऊन पूर्वेच्या श्रीमहाबलेश्वर मंदिरात एकत्र आलेल्या आहेत या ठिकाणी तशी प्रतिकृती आहे.

शिवलिंग स्वयंभूखडकातून असून रुद्राक्षकृती खाचखळग्यातून सतत पाणी वाहत असते. शिवलिंग असला तरी या ठिकाणी पिंड नाही. नैसर्गिक कलाकृती निर्माण झालेली आहे या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. अनेक भागातील भक्तांचा लोंढा डांबरी रस्त्यातून बाहेर वाहत असतो. जादा गाड्याही तेवढ्याच आलेल्या असतात तेंव्हा हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी केला जातो .

पंचगंगेच्या मंदिराबाहेर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले रुद्रेश्वर व रुद्र्तीर्थ मंदिर भग्नावस्थेत आहेत .पंचगंगा व महाबळेश्वर मंदिरादरम्यान अतिबलेश्वर मंदिर आहे त्यासमोर हंसतीर्थ होते असे सांगतात . पंचगंगेच्या मागील बाजूस टेकडीवर १९५६ मध्ये रामदास स्वामींनी बांधलेले शेणाच्या मारुतीचे मंदिर आहे बरोबर अनंत भट्ट व दिवाकर भट्ट होते दासबोधाची हस्तलिखित प्रत त्या दोघांना देऊन त्यांना येथे वास्तव्य करण्यास सांगितले. एवढेच क्षेत्र महाबळेश्वर हे पौराणीक व एतिहासिक काळात धार्मिक व सामाजिक दृष्टीने महत्वाचे बनले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]