28.6 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeराष्ट्रीय*पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताची नवी ओळख - खा.तीरथसिंह रावत*

*पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताची नवी ओळख – खा.तीरथसिंह रावत*

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताची नवी ओळख – खा.तीरथसिंग रावत गरीब कल्याण,सुशासन व सेवा क्षेत्रात न भुतो न भविष्यती काम 
     लातूर/प्रतिनिधी: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागील ९ वर्षात देशात ‘न भूतो न भविष्यती’ असे काम झाले आहे.गरीब कल्याण,सुशासन व सेवा या त्रिसूत्रीचा वापर करीत समाजातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा,यासाठी हे सरकार कार्यरत असून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाने जगात भारताची नवी ओळख निर्माण केली आहे,असे मत उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार तीरथसिंग रावत यांनी व्यक्त केले.   भाजपाच्या मोदी @ 9 अभियाना अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खा. रावत बोलत होते.

यावेळी मध्यप्रदेश राज्याचे पर्यटन मंत्री विनोद गोठिया क्लस्टर प्रमुख आ.संभाजीराव पाटील निलंगेकर,खा. सुधाकरराव शृंगारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.रमेशअप्पा कराड, लोकसभा निवडणूक प्रमुख दिलीपराव देशमुख, प्रदेश सचिव तथा जिल्हा प्रभारी किरण पाटील, सरचिटणीस शिरीष कुलकर्णी,प्रवीण सावंत, ॲड.दिग्विजय काथवटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.    पत्रकारांशी संवाद साधताना खा.रावत म्हणाले की,मोदी यांच्या कारकीर्दीस 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिनांक ३० मे ते ३० जून या कालावधीत मोदी @ 9 अंतर्गत महासंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.यादरम्यान लोकसभा व विधानसभा क्षेत्र तसेच प्रत्येक गावातील प्रत्येक घराशी संपर्क साधण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.याशिवाय पत्रकार परिषद,लाभार्थ्यांशी व प्रतिष्ठितांशी संवाद आणि विविध संमेलनांच्या माध्यमातून केंद्र सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोचविली जाणार आहे. दि.२० ते ३० जून यादरम्यान प्रत्येक घराशी संपर्क साधला जाणार आहे.दि.२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. दि.२५ रोजी शामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले. 

  मागच्या ९ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत.स्वातंत्र्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासाची कामे होत आहेत. ३७० कलम हटवण्याचे क्रांतीकारी पाऊल या सरकारने उचलले. तीन तलाक बाबत महिलांच्या हिताचा निर्णय घेतला.कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न साकार करत प्रभू श्रीराम मंदिराचा प्रश्न मार्गी लावला,असे ते म्हणाले.देशातील गरीब नागरिकांना स्वयंपाकाचा गॅस,वीजजोडणी दिली.कोरोनाच्या काळात घरपोच अन्नधान्य पुरवले.स्वातंत्र्यानंतर देशात विमानतळांची संख्या दुप्पट केली.देशात रस्ते आणि रेल्वेमार्गांचे जाळे निर्माण करण्यात आले.असंख्य योजनांच्या माध्यमातून विकासाची कामे केली जात आहेत.मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय अर्थव्यवस्था जगातील पहिल्या ५ अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट झाली आहे.जगात भारताच्या या गौरवपूर्ण वाटचालीची दखल घेतली जात असून देशाची नवी ओळख निर्माण झाली असल्याचेही ते म्हणाले.  

 मध्यप्रदेशचे मंत्री विनोद गोठिया यांनी आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून बेरोजगारी दूर करण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली.संरक्षण क्षेत्रात देश स्वयंपूर्ण झाला आहे.देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढविण्यात आली आहे.गरीबांना मोफत उपचाराची सुविधा देण्यात येत आहे.भारताच्या कुटनीतीने पाकिस्तानचे तोंड बंद करण्यात आले असून चीनलाही माघार घ्यावी लागली आहे.विकसनशील देश ऐवजी आता विकसित देश म्हणून भारताची वाटचाल सुरू आहे.मागच्या ७० वर्षात जे झाले नाही ते केवळ ९ वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात झालेले असल्याचेही गोठिया यांनी सांगितले.    यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]