विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा
— शिवराज पाटील चाकूरकर
लातूर. -आजच्या शिक्षणामध्ये व्यावहारिक ज्ञान, विज्ञान आणि आध्यात्माचा आधार घेऊन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा तसेच सांस्कृतिक मूल्यांचे संस्कार घडून यावेत असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा सभापती तथा माजी राज्यपाल पंजाब डॅा. शिवराज पाटील चाकूरकर यांनी बोलताना व्यक्त केले.
येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 23 व्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने दि.19 जुलै 2021 रोजी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.महाविद्यालयातील परीक्षा विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये सर्व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून हैदराबाद मुक्तीलढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. महाविद्यालयाच्या वतीने मा.डॉ. शिवराज पाटील चाकूरकर यांचा प्राचार्य डॉ. सिद्रामप्पा डोंगरगे यांच्या हस्ते, कुलगुरू मा. मृणालिनी फडणवीस यांचा प्रा. डॉ शीतल येरूळे यांच्या हस्ते तर प्र. कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन यांचा #प्रा_डॉ_श्रीकांत_गायकवाड याच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी प्रा. विजयकुमार धायगुडे, प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. गीता गिरवलकर, प्रा. अश्विनी रोडे यांनी विद्यापीठ गीत सादर केले.
पुढे बोलताना डॉ. शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले की, समृद्ध भारत बनवायचा असेल तर आपल्याला महापुरुषांचे विचारकार्य व तत्त्वज्ञान सर्वांपर्यंत रुजवणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून एकमेकांमध्ये बंधुभाव वाढला पाहिजे आणि आपले कर्तव्य ही आपण ओळखले पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, भारत हा तरुणांचा देश आहे. तरुणांनी आपल्या मधील उणीवा व संधी शोधून नवनवीन शिक्षण क्षेत्राची निर्मिती केली पाहिजे आणि आव्हानांना पेलण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे असे त्या म्हणाल्या.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड चे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन म्हणाले की, आपले शिक्षण हे समाजाच्या उपयोगी यावे. यशाची स्वप्ने आपण बघितली पाहिजेत. शिक्षणाच्या माध्यमातून आपण एक आदर्श व्यक्ती निर्माण झाले पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरे यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आलेख सर्वांसमोर मांडला. तर निकालाची उज्ज्वल परंपरा कायम अबाधित ठेवल्याची माहिती परीक्षा विभाग प्रमुख डॉ. यशवंत वळवी यांनी उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. यशवंत वळवी यांनी केले तर स्वागतपर मनोगत महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे यांनी व्यक्त केले.सूत्रसंचालन डॉ. रत्नाकर बेडगे व डॉ. उमा कडगे यांनी केले व आभार रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय गवई यांनी केले.
या कार्यक्रमाला शैलेश पाटील चाकूरकर, प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, ऍड. सोनकवडे, माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, डॉ. एम. एस. दडगे, श्री. घाडगे, डॉ. यू. व्ही. बिरादार, प्रा. गिरजप्पा मुचाटे यांच्यासमवेत महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी लातूर शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती व पत्रकार उपस्थित होते.












