वाढदिवस विशेष
1991 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो आणि सामाजिक कामाची सुरुवात झाली. 1992 साली मुंबई येथे झालेल्या विराट विद्यार्थी मोर्चाचे धाराशिव जिल्हा केंद्र शहर मंत्री म्हणून नेतृत्व केले. त्यानंतर 1993 साली उमरगा तालुक्यात झालेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर च्या मदत कार्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विद्यार्थी परिषदेच्या सेवा कार्यात सहभाग घेतला. सेवा केंद्रातून सेवाकार्य केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर व्हावे म्हणून धाराशिव शहरात नामांतर समर्थन परिषद तसेच नामांतरासाठी सर्व महाविद्यालयावर विद्यार्थी जनजागृती साठी काम केले.99 पासून धाराशिव जिल्ह्यात वेगवेगळ्या दैनिकात काम सुरु आहे. 2008 सालापासून प्रसार भारती चा प्रतिनिधी म्हणून धाराशिव जिल्ह्यात कार्यरत आहे. प्रसार भारतीचा आकाशवाणी प्रतिनिधी म्हणून सुरू झालेले प्रसार भारती चे काम 2010 सालापासून दूरदर्शनचे ही काम सुरू झाले आकाशवाणी दूरदर्शन प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातील अनेक विकासात्मक बाबीवर लिखाण करून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावत आहे.

यासोबतच दैनिक तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही काम करत आहे. दैनिक तरुण भारत च्या वतीने या वर्षी धाराशिव शहरात पहिल्यांदा गणेशोत्सव व्याख्यानमाला भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सुरू करून संघ विचाराची पहिली व्याख्यानमाला धाराशिव शहरात सुरु केली. प्रसार भारती चा देशपातळीवर चा उत्कृष्ट आकाशवाणी वार्ताहर चा पुरस्कार 2011साली तसेच कोरोना प्रतिबंधक लॉक डाऊन मध्ये उत्कृष्ट वार्तांकनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. याशिवाय कळंब तालुका पत्रकार संघाचा विधायक वृत्त वहिनी प्रतिनिधी पुरस्कार मिळालेला आहे.
लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष या नात्याने जलसंधारण क्षेत्रात तसेच साक्षरता विषयक वर्ग घेऊन कार्य केलेले आहे.

जिल्हा पर्यटन विकास समितीचा सचिव या नात्याने पर्यटन स्थळांना भेटी देऊन जनजागृती तसेच प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतलेला आहे.
उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणून जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना उस्मानाबादी शेळी चे वाटप करणे सह प्रबोधनात्मक विषयावर जनजागृती करण्याचे काम केले आहे.
ठाण्यातील विद्यार्थी सेवा सहयोग निधी या संस्थेच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गोरगरीब विद्यार्थी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदतही केली.
आयुष्याच्या या टप्प्यावर आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सदिच्छा आणि आशीर्वाद यामुळे सामाजिक कामाची उर्जा द्विगुणित व्हावी.

— देविदास पाठक
दूरदर्शन – आकाशवाणी – दैनिक तरुण भारत
जिल्हा प्रतिनिधी
वेदांत ॲडव्हर्टायझर्स
मुख्य संपादक साप्ताहिक उस्मानाबाद समाचार




