परशुराम जयंती निमित्त , व्याख्यान , रक्तदान शिबिर दुचाकी रॅली व योग प्राणायाम शिबिर
लातूर;दि.२९( प्रतिनिधी ) –
भगवान परशुराम जयंतीनिमित्त जयंती उत्सव समिती 2022 च्या वतीने लातुरात व्याख्यान , रक्तदान शिबिर, मोफत योग व प्राणायाम शिबिर , सायकल व दुचाकी रॅली , यज्ञ व प्रसाद आदी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे , अशी माहिती परशुराम जयंती महोत्सव समिती 2022 चे अध्यक्ष प्रवीण कस्तुरे यांनी दिली .

जगभर कोरोना विषाणूने थैमान घातल्यामुळे प्रशासनाने उत्सव , मिरवणूक आदी कार्यक्रमावर निर्बंध घातले होते . त्यामुळे गेली दोन वर्षे सर्वत्र परशुराम जयंती उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला . प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे यंदा समाज बांधवांमध्ये आणि विशेषतः तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे .त्यामुळे यंदाची परशुराम जयंती उत्साहात व जल्लोषात साजरी होणार आहे .यासाठी परशुराम जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते नियोजन करीत आहेत.
परशुराम जयंती उत्सव समितीच्या वतीने काढण्यात येणारी मिरवणूक व दुचाकी सायकल रॅली ही शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येणार आहे . भगवान परशुराम जयंती उत्सव समितीच्या वतीने दिनांक 28 29 व 30 एप्रिल आणि 2व 3 मे 2022 असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत . 28 ,29 30 एप्रिल या कालावधीत जुना औसा रस्त्यावरील डॉ. विकास निलंगेकर व डॉ. सुनीता निलंगेकर यांच्या क्लिनिकमध्ये मोफत योग व प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .सकाळी सहा ते सात या वेळेत आयोजित या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.

सोमवार दि. 2 मे 2022 रोजी सायंकाळी सहा वाजता जुना औसा रस्त्यावरील लक्ष्मी कॉलनी येथील विवेकानंद संस्कार सेवा केंद्राच्या सभागृहात महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते सच्चिदानंद शेवडे गुरुजी यांचे ‘सावरकर एक झंजावात ‘ या विषयावर धगधगते व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे .ज्येष्ठ अभियंते देवीकुमार पाठक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या व्याख्यानास उपस्थित रहावे , असे आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण कस्तुरे यांनी केले आहे.
मंगळवार दि. 3 मे 2022 रोजी विवेकानंद संस्कार सेवा केंद्राच्या कार्यक्षेत्रात सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळात रक्तदान शिबिर व बोन डेन्सिटी टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे . रक्ताचा तुटवडा लक्षात घेता जास्तीत जास्त समाज बांधवांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी पी.एम .कुलकर्णी (7972167460 ) यांच्याशी संपर्क साधावा .याच दिवशी दुपारी तीन वाजता केशवराज मंदिर रामगल्ली येथून भव्य मोटर सायकल व सायकल रॅली काढण्यात येणार आहे. यात सहभागी होण्यासाठी सुमुख गोविंदपूरकर( 77 980 42 998 ) यांच्याशी संपर्क साधावा. मंगळवारीच बार्शी रस्त्यावरील परशुराम पार्क येथे सकाळी सात ते दहा या वेळात परशुराम यज्ञ व प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

परशुराम जयंती उत्सव कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अँड.संजय पांडे, पापा शेठ ताथोडे, जगदीश कुलकर्णी ,प्रसाद पांडे, प्रदीप नणंदकर ,डॉ.रवींद्र मोरे, संजय निलेगावकर, प्रसाद उदगीरकर, बाळासाहेब देशपांडे , सचिन कुलकर्णी ,विकास कुलकर्णी , गोपाळ जोशी ,मुन्ना शिर्शिकर ,योगेश चांदोरकर, योगेश उन्हाळे ,सुमुख गोविंदपूरकर ,शुभम कुलकर्णी, मनोज जोशी ,संजय अयाचित, अजित म्हैसेकर, पी.एम . कुलकर्णी ,अमित कुलकर्णी ,डॉ. सास्तुरकर ,डॉ. श्रीनिवास संदीकर डॉ. मालू.सुमित्रा तारे, ज्योती खरोसेकर, कांचन भावठाकर, मंजू वावरे, शिल्पा जोशी, शुभांगी पाटील आदीनी केले आहे.




