विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात, जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
लातूर – दि १२ मे २०२२, परिचर्या व्यावसायाची जननी आद्यपरिचारीका, मिस फ्लॉरेन्स नाईटिंगेल,
यांच्या जन्मदिनानिमित्त, जागतिक परिचारिका दिन जगभर साजरा केला जातो.या दिनानिमित्त संपूर्ण सप्ताहात,सर्वत्र विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना संचलित उत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुग्णालयाच्या मुख्य अधिसेविका,श्रीमती अमृता पोहरे या होत्या तर प्रमुख अतिथी लातूर नगरीचे महापौर,विक्रांत गोजमगुंडे तसेच रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांची उपस्थिती होती.

यावेळी व्यासपीठावर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.महादेव बनसुडे विलासराव देशमुख परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती अश्विनी बेले, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा लातूर संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती छाया चव्हाण,उत्सव समिती च्या अध्यक्ष श्रीमती किरण निकम इत्यादींची उपस्थिती होती. संघटनेच्या राज्य सरचिटणीस श्रीमती सुमित्रा तोटे,यांनी प्रास्ताविक पर भाषण करताना, मागील दोन वर्षात सर्वच जण कोव्हीड महामारीमुळे ताणतणावात असल्याने हा दिवस साजरा करता आला नाही हे सांगून दोन वर्षांतील आठवणींना उजाळा दिला.
लातूरचे महापौर ही या काळात परिचारीकाप्रमाणेच घरापासून दूर राहून जनतेची काळजी घेत होते.आज दोन वर्षांनंतर अतिशय आनंदात जागतिक परिचारिका दिन साजरा होत आहे.परंतु या परिचारीका दिनावरही, शासनाने घेतलेल्या बाह्यस्त्रोताद्वारे परिचारीका पदभरती व परिचारीकांची प्रशासकीय बदली यामुळे चिंतेचे सावट असल्याचे सांगून राज्यभर या निर्णयाचा विरोध होत असल्याचे सांगितले,तसेच ,संघटनेचे मुख्यालय लातूर असून मा.वैद्यकिय शिक्षण मंत्रीही लातूरचे असल्याने, राज्यातील परिचारीकांना लातूरकरांकडून अपेक्षा आहेत तर .महापौर,विक्रांत गोजमगुंडे यांनी, लातूरसह राज्यातील परिचारीकांच्या अडचणी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमितभैय्या देशमुख यांच्या पर्यंत पोहचवाव्या अशी विनंती केली. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनीही, लगेचच वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याशी वॉटस ॲपद्वारा संपर्क करुन या बाबत चर्चा केली.तसेच आपणही कोरोना काळात परिचारिका प्रमाणे काम केले असल्याने मलाही स्वतः ला परिचारीका म्हणून घेण्यात अभिमान वाटते असे बोलून, लातुरसह राज्यातील परिचारीकांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.
. अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांनीही फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा इतिहास सांगून परिचारीकांच्या रुग्णसेवेतील योगदानाबद्दल कौतुक केले. अधिसेविका श्रीमती अमृता पोहरे यांनी परिचारीकांनी कोव्हीड काळात अगदी फ्लॉरेन्स नाईटटिंगेल यांच्याप्रमाणेच कार्य केले असल्याचे सांगून,पुढेही त्या उत्तम सेवा देतील अशी ग्वाही दिली. प्राचार्या श्रीमती अश्विनी बेले यांनीही जागतिक परिचारिका दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती उणिता देशमाने व श्रीमती बालिका सावंत यांनी केले.तर आभार संघटनेचे जिल्हा सचिव श्री भागवत देवकत्ते यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समिती उपाध्यक्ष,श्रीमती मिना दैवज्ञ,श्रीमती सुधा तोरणेकर,श्रीमती शोभा जाधव, श्रीमती ज्योती भारती,श्रीमती चंद्रज्योत्स्ना खंदारे,श्रीमती मंगल सिरसाठ,श्रीमती आशा मिसाळ,श्री योगेश वाघ,श्रीमती निर्मला गाडेकर,श्रीमती कल्पना गायकवाड, संघटनेचे उपाध्यक्ष श्री संजीव लहाने,रेणुका रेड्डीश्रीमती शारदा खोब्रागडे,श्रीमती लता सोनवणे, श्रीमती माया गरड, श्रीमती मंगल कदम,मिना गावकरी,श्री पांडुरंग गव्हाणे,श्रीमती शिला कांबळे, श्री दिपक सोळंके,विवेक वागलगावे,दिपक शिंदे,भगवान केंद्रे,मजहर शेख, नितीन गव्हाणे,मकरंद दिघे,प्रवीण मोराळे,प्रशांत केंद्रे, सुग्रीव गोरे,धनश्री गोसावी,रमांजली माने, भागवत मुंडे,जगन्नाथ कोरके, मैना पवार,तबसुम पठाण,इत्यादींनी परिश्रम घेतले तर यावेळी उत्सव समिती व संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




