औरंगाबाद , दि .11 : कुणी तरी सांगितल्यावरुन ,आई – वडिलांची इच्छा आहे म्हणून बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळतात पण विद्यर्थानी हे कायम लक्षात ठेवावे की कोणतेही यश कठोर परिश्रम आणि नियोजन केल्याशिवाय मिळत नाही . तेव्हा परिश्रम आणि योग्य नियोजन करून यश संपादन करा . आयुष्यात यशस्वी व्हा असे प्रतिपादन आमदार संजय शिरसाठ यांनी काल येथे केले . औरंगाबाद येथील सातारा परिसरातील राज्य शासनाच्या पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे ( बार्टी ) तर्फे नालंदा बहुददेशीय सेवाभावी संस्थेत पोलीस आणि मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षणाचा निरोप समरंभ आयोजित केला होता , तेव्हा आ .शिरसाठ बोलत होते .

यावेळी कार्य्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त सनदी अधिकारी आर.के. गायकवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्ती माहिती उपसंचालक यशवंत भंडारे , नालंदा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भास्कर शिंदे हे उपस्थित होते .यावेळी यशवंत भंडारे यांचा सेवानिवृत्ती निमित्त आ. शिरसाठ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपले आयुष्य बदलण्याची किमया शिक्षणातून होऊ शकते , त्यामुळे विद्यर्थानी मिळालेल्या संधीचा योग्य वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावे . कष्टाला पर्याय नसतात तेव्हा कष्ट करण्याची तयारी ठेवावी , ध्येय निश्चित करून ते साध्य करण्याची जिद्द बाळगून ते ध्येय साध्य करावे . आपले आई – वडील आणि आपल्याकडून अपेक्षा असणाऱ्यांच्या अपेक्ष्या पूर्ण कराव्यात . जीवनात यशस्वी होऊन, घेणारे नाही तर देणारे बनावे , असे आवाहन करून त्यांनी बार्टीतर्फे घेण्यात येणार हे प्रशिक्षण खूप महत्वाचे आणि उपयुक्त आहे , ते यापुढेही सुरू राहावे यासाठी मी स्वतः लक्ष घालेन , असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले .
योग्य दिशेने , योग्य मार्गदर्शन आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असणाऱ्यांचा विजय ठरलेला असतो . स्वतःला सिध्द करावयाचे असेल तर स्वतःच्या क्षमतांचा योग्य वापर कराल तर यश सहज शक्य आहे ,असे सांगून भविष्यात यशस्वी होणाऱ्या विद्यर्थ्यांनी संविधानिक मूल्यांच्या अनुषंगाने प्रशासनात काम करावे . सामान्य माणसाला न्याय मिळेल असे वर्तन आणि आपल्या वाट्यास आलेल्या कामावर अपार निष्ट असेल तर आपण जेही काम कराल त्यांचे सोने होईल . यश मिळेलच त्याचबरोबर समाधानही मिळेल , असे विचार सत्काराला उत्तर देताना यशवंत भंडारे यांनी व्यक्त केले . या प्रशिकणाचा लाभ घेलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन दीर्घ काळ अभ्यास करण्याची तयारी ठेवावी ,सत्यात असावे आणि चांगली बैठक म्हणजे किमान 10 ते 12 तास अभ्यास करण्याची तयारी विद्यर्थ्यांनी ठेवावी, असे आवाहन भास्कर शिंदे यांनी या वेळी केले .
राज्य शासनाने समाज कल्याणच्या बार्टीच्या माध्यमातून याप्रशिक्षणाची सोय केल्याने अनुसूचित जातीच्या विद्यर्थ्यांची फार मोठी सोय झाली आहे . या योजनेची उपयुक्तता लक्षात आल्याने आता ही योजना अनुसूचित जमातीनाही लागू केल्या आहेत , तसेच सारथी संस्थेही ही योजना स्वीकारली आहे पण या योजनेचा कालावधी वाढवण्याची गरज आहे . त्यासाठी आ . शिरसाठ यांनी प्रयत्न करावेत , असे आवाहन आर के गायकवाड यांनी या वेळी केले . यावेळी दिगंबर गायकवाड, व्ही .के. वाघ , प्रा .देवानंद पवार आदी उपस्थित होते . यावेळी स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या आणि उत्कृष्टरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भंडारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . *