विविध धार्मिक कार्यक्रमाने भाविकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण
इचलकरंजी ; (प्रतिनिधी ) –शहरातील गावभाग महादेव मंदिर ,शिव मंदिर ,यड्राव ओंकारेश्वर मंदिर यासह विविध ठिकाणच्या मंदिरात आज सोमवारी पहिल्या श्रावण सोमवार निमित्त श्रीं च्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.ओम नम: शिवाय ,हर हर महादेव असा नामाचा जयघोष करत
पहाटेपासून मंदिरात श्रींचा अभिषेक , विधीवत पुजा अर्चा ,आरती ,प्रसाद वाटप व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.यावेळी भाविकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण दिसून आले.

मागील आठवड्यातील शुक्रवारपासून श्रावण महिन्यास प्रारंभ झाला आहे.तत्पूर्वी ,म्हणजे मागील सोमवारी राजस्थानी बांधवांनी दरवर्षी प्रमाणे श्रावण महिन्यानिमित्त इचलकरंजी ते रामलिंग कावड याञा सुरु केली आहे.ही याञा दर सोमवारी सकाळी काढण्यात येणार आहे.आज सोमवारी श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने इचलकरंजी शहरातील गावभाग महादेव मंदिर , कोल्हापूर रोडवरील शिवमंदिर ,यड्राव ओंकारेश्वर मंदिर यासह विविध ठिकाणच्या महादेव मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. यावेळी ओम नमः शिवाय हर हर महादेव असा नामाचा जयघोष करत पहाटेपासून मंदिरात श्रींचा अभिषेक , विधीवत पुजा अर्चा ,आरती , प्रसाद वाटप व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.मंदिर आवारात पुजेचे साहित्य , फराळाचे साहित्य विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते.श्रावण सोमवारनिमित्त भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेवून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गोसंवर्धनी अग्निहोत्र ट्रस्टच्या वतीने रुद्र पूजा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिला भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रारंभी मंगल हवन करून रुद्र पूजा विधीला सुरुवात झाली. पूजेनंतर आरती व प्रसाद वाटप करण्यात आले. एकंदरीत ,श्रावण महिन्यातील पहिला सोमवार भाविकांमध्ये उत्साह व चैतन्याचे वातावरण निर्माण करणारा असल्याचे दिसून आले.