कोल्हापूरचे महत्वाचे मार्ग बंद
पुणे- बेंगलोर *NH-4 हायवे* लगत असणारे सांगली फाटा ते कोल्हापूर कडे जाणारा सर्विस रोड व बेंगलोर पुणे कडून शिरोली कडे जाणारा सर्विस रोड 3-4 फूट रोडवर पाणी असलेने बंद करण्यात आलेले आहेत.
तसेच *सांगली फाटा ते सांगली* जाणारे शिरोली जुन्या नाक्याजवळ मार्बल लाईन येथे रोडवर पाणी साचल्याने सदरचा रस्ता बंद असून एकेरी वाहतूक सुरू आहे.
*हनुमान नगर शिये -कसबा बावडा* कडे जाणारा रस्ता शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील शिये नाका येथे बंद असून
हनुमान नगर येथे बेरीकटिंग करून बावड्या कडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.
*शिये-भुये, निगवे कडे* जाणारा मेन रोड आडवा ओढा येथे रोडवर तीन ते चार फूट पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. पर्यायी मार्ग आहेत. कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही.
पाण्याची पातळी कडे लक्ष ठेवून आहोत. वरील ठिकाणी बेरीकॅटींग करून बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पेट्रोलिंग सुरू आहे.
(फोटो : संग्रहित)











