पाच रुग्णवाहिका लोकार्पित

0
252

 

गणेश चतुर्थी शुभमुहूर्तावर पाच रूग्‍णवाहिकेचे

आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या हस्‍ते लोकार्पण

लातूर दि. १०- भारतीय जनता पार्टीचे जिल्‍हाध्‍यक्ष तथा विधानपरिषदचे सदस्‍य आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या स्‍थानिक विकास निधीतून नागरीकांच्‍या आरोग्‍याची प्राथमिकता लक्षात घेवून श्रीगणेश चतुर्थी निमित्‍त ७२ लक्ष रूपये खर्चाच्‍या पाच रूग्‍णवाहिकांचे लोकार्पण शुक्रवारी करण्‍यात आले.

गेल्‍या दिड वर्षात कोरोना आजाराच्‍या पहिल्‍या आणि दुसऱ्या लाटेत गरजू रूग्‍णांना अत्‍यावश्‍यक सेवा तात्‍काळ वैद्यकीय मदत मिळवून देण्‍यासाठी रूग्‍णवाहिका ही गरज बनली होती. ही गरज लक्षात घेवून गेल्‍या एप्रिल महिन्‍यात आ. रमेशअप्‍पा कराड यांनी आमदार निधीतून पोहरेगाव, जवळा बु. येथील प्रा‍थमिक आरोग्‍य केंद्र आणि मुरूड ग्रामीण रूग्‍णालय अशा एकूण तीन रूग्‍णवाहिकेचे लोकार्पण केले. सदरील रूग्‍णवाहिका अनेकांना अडचणीच्‍या काळात मदतीस आल्‍या.

भविष्‍यात येणाऱ्या कोरोना आजाराचा मुकाबला करता यावा, इतर आजारासाठी गरजू रूग्‍णांना सोय व्‍हावी त्‍यांना तत्‍परतेने पुढील उपचार मिळावेत यासाठी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी आपल्‍या स्‍थानिक विकास निधीतून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील बिटरगाव, कारेपूर, बोरी, तांदूळजा येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रास प्रत्‍येकी एक त्‍याचबरोबर रेणापूर येथील ग्रामीण रूग्‍णालयाकरीता एक अशा एकूण पाच सुसज्‍ज रूग्‍णवाहीका मंजूर केल्‍या. या रूग्‍णवाहिकेसाठी प्रत्‍येकी १४ लाख ३८ हजार रूपये खर्च आला आहे.

सदरील पाचही रूग्‍णवाहीकेचे लोकार्पण आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या शुभहस्‍ते गणेश चतुर्थी निमित्‍ताने करण्‍यात आले. कोरोना आजाराचे संकट कायमस्‍वरूपी नष्‍ट होवू द्या अशी अपेक्षा सुखकर्ता दुखकर्ता श्रीगणेशाच्‍या चरणी आ. रमेशअप्‍पा कराड यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.

रूग्‍णवाहिका लोकार्पण कार्यक्रमास रेणापूर ग्रामीण रूग्‍णालय आणि बिटरगाव, कारेपूर, बोरी, तांदूळजा येथील आरोग्‍य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यासह प्रदेश किसान मोर्चाचे प्रदिप पाटील खंडापूरकर, जिल्‍हाध्‍यक्ष साहेबराव मुळे, मराठवाडा भाजपा संपर्क प्रमुख बाबासाहेब घुले, विधानसभा प्रमुख अनिल भिसे, लातूर तालुकाध्‍यक्ष बन्‍सी भिसे, रेणापूर तालुकाध्‍यक्ष दशरथ सरवदे, लातूर कृऊबा संचालक विष्‍णुदास मोहिते, गोविंद नरहारे, जिल्‍हा उपाध्‍यक्ष भागवत सोट, सतिष अंबेकर, वसंत करमुडे, राजकिरण साठे, शाम वाघमारे, उपसभापती अनंत चव्‍हाण, अशोक बिराजदार, सुरेश पाटील, भैरवनाथ पिसाळ, दत्‍ता सरवदे, विजय चव्‍हाण, महेश गाडे, धनराज शिंदे, भाऊसाहेब गुळभिले, काशिनाथ ढगे, पांडूरंग बालवाड, रशिद पठाण, सुधाकर गवळी, पुंडलिक बेंबडे, श्रीकृष्‍ण पवार, अच्‍युत भोसले, महेंद्र गोडभरले, रमाकांत फुलारी, प्रशांत शिंदे, गोपाळ पाटील, राजू आलापुरे, समाधान कदम, शुभम खोसे, संजय डोंगरे, संतोष चव्‍हाण, सतिष बिराजदार, अक्षय भोसले, किरण मुंडे, महादेव मुळे, मारूती शिंदे, धोंडीराम ठोंबरे, संजय ठाकूर, ओमकार क्षीरसागर, गोपाळ पवार, वसंत करमुडे, अजित गायकवाड, शालिक गोडभरले, नरसिंग येलगटे, व्‍यंकट गुळभिले, माधव घुले, वैजनाथ लवटे, प्रदिप चव्‍हाण, गणेश चव्‍हाण यांच्‍यासह अनेकजण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here