27.6 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeदिन विशेषपालकमंत्री ना.अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बाभळगाव येथे मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

पालकमंत्री ना.अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बाभळगाव येथे मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

लातूर प्रतिनिधी

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व  सांस्कृतिक कार्यमंत्री  तथा लातूर जिल्ह्याचे  पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आज रविवार दिनांक २० मार्च २०२२ रोजी लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. चिंचोळकर व वैद्यकीय अधिकारी डॉ.गंगणे  यांनी रुग्णांची तपासणी केली.सर्जरीसाठी सलेक्ट झालेले पेशंट विलासराव देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूर येथे सर्जरीसाठी पाठवण्यात येणार आहेत.लातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे समन्वयक प्रवीण पाटील चेअरमन निराधार कमिटी लातूर ग्रामीण व सुभाष घोडके अध्यक्ष लातूर तालुका काँग्रेस कमिटी याप्रसंगी प्रताप पाटील सभापती पंचायत समिती लातूर, ज्ञानोबा गवळे अध्यक्ष लातूर तालुका काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग यांनी भेट दिली.

 शिबिर यशस्वी करण्यासाठी सुभाष जाधव सदस्य जिल्हा परिषद लातूर, सहदेव मस्के माजी सदस्य जिल्हा परिषद लातूर, गोविंदराव देशमुख उपसरपंच बाभळगाव, भाडोळे गणपतराव चेअरमन विकास सोसायटी बाभळगाव, अशोक नाडागुडे सदस्य ग्रामपंचायत बाभळगाव, जीवन राव देशमुख महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष, गोपाळ थडकर सदस्य ग्रामपंचायत बाभळगाव यांनी परिश्रम घेतले.

अशाच नेत्रतपासणी व सर्जरी शिबिराचे लातुर तालुक्यामध्ये दहा ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बोरी प्राथमिक आरोग्य केंद्र, भातांगळी प्राथमिक आरोग्य केंद्र, चिखुर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र, जवळा बु. प्राथमिक आरोग्य केंद्र, तांदुळजा प्राथमिक आरोग्य केंद्र, मुरुड ग्रामीण रुग्णालय , चिंचोली बु. प्राथमिक आरोग्य केंद्र, निवळी प्राथमिक आरोग्य केंद्र व गंगापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]