पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी विविध संस्था
शिष्टमंडळ पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या घेतल्या भेटीगाठी…
लातूर-राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी आज शनिवार दि. २ ऑक्टोबर २१ रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था शिष्टमंडळ, पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या निवेदनाचा स्वीकार करून संबंधितांना पुढील कार्यवाहीसाठी सूचना केल्या.
पालकमंत्री ना. देशमुख यांची यावेळी चाकुर तालुका काँग्रेस शिष्टमंडळ, धनगर समाज शिष्टमंडळ लातूर आदी शिष्टमंडळासोबत चर्चा करून त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधितांना सूचना केल्या.

यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, महिला काँग्रेसच्या पदाधिकारी विद्याताई पाटील, व्हा. चेअरमन जिल्हा समन्व्य समिती सदस्य विजय देशमुख, चाकुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास पाटील, निलेश देशमुख, रामराव बुद्रे, एन.आर.पाटील, पप्पू शेख, डॉ. संजय शेळके, अकबर माडजे, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, सतीश धोत्रे, डॉ. प्रशांत देशपांडे, ॲड. नरेंद्र होळकर, ॲड. दिलीप ठाकूर, संभाजी बैकरे, नागनाथ गाडेकर, प्रा. अशोक अभंगे, बालाजी वाघमारे आदीसह विविध शिष्टमंडळाचे सदस्य पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.











