पालकमंत्र्यांनी दिलेले वचन पाळावे

0
250

 

21 टीएमसी पाणी लातूरला देण्याचे वचन पालकमंत्र्यांनी पाळावे

– माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर दि.महाराष्ट्रामध्ये मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून प्रसिध्द आहे. हे संकट कायमचे घालण्यासाठी मागील काळात उजणी धरणाचे पाणी कृष्णा व गोदावरी खोर्‍यातून लातूरसहीत मराठवाड्याला आणण्यासाठी कै.विलासरावजी देशमुख यांनी भूमिपुजन केले होते. तेच उजणी धरणातील पाणी लातूरला निवडूण आल्यांनतर एक महिण्यात आणू नसता राजीनामा देवू असे जाहीर वचन ना.अमित भैय्या देशमुख यांनी दिले होते. आज ते राज्यात कॅबीनेट मंत्री आहेत. महाविकास आघाडी सरकारला येवून पावनेदोन वर्ष होत आहे. तरीही उजणीच्या पाण्यासंदर्भात कसलीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी जनतेला दिलेले वचन पाळावे, असे आव्हान माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.

यावेळी ते जननायक संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारीणीच्या एमआयडीसी येथील स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात आयोजित बैठकीत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला जननायक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांतराव शेळके, जनननायक संघटनेचे कार्याध्यक्ष निळकंठराव पवार, शहर जिल्हाध्यक्ष एस.आर.मोरे, पत्रकार व्यंकट पन्हाळे, ओमप्रकाश आर्य, प्रतापराव शिंदे, एन.जी.माने, जमीलभाई मिस्त्री, नगरसेवक बालाजी शेळके, जाफर पटेल, महाराष्ट्र बँकेचे संचालक सुभाषअप्पा सुलगुडले, बाबासाहेब देशमुख, महादेव गायकवाड,शिवराम कदम, श्रीकांत झाडके, भोकरेताई आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलाताना जननायक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.कव्हेकर म्हणाले की, खाजगी पीकविमा कंपन्याऐवजी शासकीय कंपन्यामार्फत पीक विमा भरण्याची सुरूवात करावी. राज्यामध्ये राज्य शासनाने विविध कंपन्यांना पिकाचा विमा काढण्याचा ठेका दिलेला आहे. त्यातून अनेक जाचक अटीला सामोरे जावे लागते. त्यातून विमा मिळणे शेतकर्‍याला कठीण झालेले आहे. विम्याच्या नावावर शेतकर्‍यांची लूबाडणूक होत आहे. त्यामुळे खाजगी कंपन्यामार्फत विमा काढणे बंद करून शासनाने स्वतःच्या विमा कपंन्यामार्फतच शेतकर्‍यांचा पिक विमा भरण्याची प्रक्रिया सुरू करावी. गेल्या वर्षीचा सोयाबीनचा विमा एक रूपयाही मिळाला नाही. तो त्वरीत द्यावा, अशी मांडणी अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रभावीपणे शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मांडली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अब्दुल गालीब शेख यांनी केले. तर आभार जमीलभाई मिस्त्री यांनी मानले. यावेळी सुर्यकांतराव शेळके, एस.आर.मोरे, ओमप्रकाश आर्य, व्यंकट पन्हाळे, महादेव गायकवाड, कमलाकर डोके, परिक्षीत सांडूर, बाबासाहेब देशमुख, प्रतापराव शिंदे आदींनी विचार मांडले. यावेळी कार्यक्रमाला वैजनाथ जाधव, मंजूरखॉ पठाण, सुभाषअप्पा सुलगुडले, राजाभाऊ मुळे, कमलाकर कदम, केदार पाटील,सौदागर पवार,राजपाल पाटील, दिनकर पाटील, ललीत पाटील, भारत सिरसाठ, संभाजी सुरवसे, उध्दव जाधव, बापू शिंदे, सुभाष सोनवणे,बबु्रवान पवार, शिरीश गांधले, हनमंत कातपुरे, कानिफनाथ जोशी, सिद्राम जोगी, मनोज जाधव, जाजू शेठ, विकास जाधवयांच्यासह जननायक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मध्यप्रदेशच्या धर्तीवर कोरोनाग्रस्तांना मदत द्यावी

केंद्र सरकारने देशातील कोरोनाग्रस्तांसाठी विविध प्रकारची 21 लाख कोटीची मदत जाहीर केली. मध्येप्रदेश भाजपा सरकारने राज्यातील जनतेला प्रत्येक कुटुंबाला 50 हजार रूपये अनुदान व पेंन्शन सुरूवात केली. दिल्‍ली तेलंगणा सरकारने दिली आहे. परंतु राज्य सरकारने काहीही मदत दिलेली नाही. उलट कर्जमाफी घोषणा व वेळेत कर्ज भरणार्‍यांना 50 हजार रूपयाची मदत जाहीर करून काहीही मदत केलेली नाही. त्यामुळे सरकारने राज्यातील सामान्य जनतेला कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर त्वरीत मदत जाहीर करावी. असे आव्हान माजी आ.कव्हेकर यांनी केले.

राज्य सरकारने देशाची मुल्ये उद्ध्वस्त केली

महाराष्ट्र हा देशामध्ये मुल्य आधारीत समाजवादी विचाराचा म्हणून प्रसिध्द आहे. या महाराष्ट्राच्या एका मंत्र्यांनी दरमहा 100 कोटी वसूल करून द्यावे. अशी मागणी केल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. ज्या महाराष्ट्रात चिमनराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या स्वांतत्र्यलढ्यासाठी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. डॉ.आंबेडकरांनी हिंदू कोड बील मंजूर होत नाही म्हणून दिला.तर मा.शिवराज पाटील चाकूरकर यांनीही राजीनामा दिला. तसेच 370 कलमासाठी डॉ.शामप्रसाद मुखर्जी यांनी राजीनामा दिला. या मुल्याच्या आदर्शपरंपरेला सध्याच्या राज्यसरकारने काळीमा फासलेला आहे. असे प्रभावी व मुद्देसुद विचार माजी आ.कव्हेकर यांनी मांडले. यास कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

——————————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here