नांदेड… जिल्ह्यात आज दिनांक २३ जुलै २०२१ रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात धर्माबाद ईथ अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस धर्माबाद महसुल मंडळात ८६ मिलीमीटर नोंदवला गेला आहे. त्या खालोखाल बिलोली ६४ मिलीमीटर, हिमायतनगर आणि नायगाव मध्ये प्रत्येकी ५० मिलीमीटर, मुदखेड ३४ मिलीमीटर, ऊमरी २९ मिलीमीटर, किनवट २५ मिलीमीटर, देगलूर १८.४० मिलीमीटर, हदगाव १७ मिलीमीटर, कंधार आणि मुखेड १४ मिलीमीटर, भोकर १३ मिलीमीटर, अर्धापूर ८ मिलीमीटर पाऊस झाला असल्याची नोंद महसुल कर्मचाऱ्यांनी (मॅन्यूअल) नोंदी घेतलेल्या आहेत.
गत वर्षीपासून महावेध प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यात ८० महसुल मंडळात पाऊस मोजणी यंत्राद्वारे काॅम्प्यूटर्झड पावसाच्या नोंदी घेतल्या जातात. त्या दुपारी बारा वाजेपर्यंत मुंबईहून जाहिर केल्या जातात. तसेच जिल्ह्याच्या वार्षिक सरासरी पावसाचे नव्याने सुत्र मांडले आहे. त्या नुसार नांदेड जिल्ह्यात १ जून ते ३१ आॅक्टोबर या काळात ८१४.४० मिलीमीटर पाऊस झाल्यास तो वार्षिक सर्वसाधारण १०० टक्के मानला जाणार आहे. यापुर्वी नांदेड जिल्ह्यात ९५५ मिलीमीटर पाऊस सर्वसाधारण मानला जात असे…











