*पाशा पटेल यांचे प्रतिपादन*

0
312

भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी पत्रकारांनी कार्य करावे..!
पाशा पटेल याचे प्रतिपादन

अहमदपूर (दि.06) पत्रकारीता ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकारीतेच्या माध्यमातून स्त्यूत्य समाजउपयोगी कार्य करता येवू शकते यासाठी भारताचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी पत्रकारांनी कार्य करावे असे प्रतिपादन राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.

साहित्य संगीत कला अकादमीच्या वतीने दर्पण दिनानिमित्त अहमदपूर-चाकुर तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार व व्याख्यान आणि दर्पण सेवा गौरव पुरस्कार व दर्पण जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बब्रूवानजी खंदाडे हे होते तर यावेळी व्यासपीठावर पं.स.सभापती गंगासागरबाई जाभाडे, सय्यद साजीदभाई,पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.विश्वंभर स्वामी, श्रीकांत बनसोडे,शंकर अबरबंडे,डॉ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी,दै.मराठवाडा नेता चे रामेश्वर बद्दर,जेष्ठ पत्रकार दिनकर मद्देवार,संतोष आचवले बलभीम पवार, भरतसिंह ठाकुर आदींची उपस्थिती होती.


पुढे बोलाताना पाशा पटेल म्हणाले की, मानवाने जीवनमान सुधारण्याच्या धांदलीत स्वतःचे जीवनमान गमावले असुन उद्याचा भारत समाज व्यवस्था, उ्द्याच्या पीढिची आरोग्य धोक्यात आले असुन भारताचीच नाही तर जगाचीही उद्या गंभीर परिस्थीती होणार आहे हे लक्षात घेवून राज्यकर्त्यांनी व पत्रकारांनी उद्याच्या पिढीसाठी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करावे असेही ते शेवटी म्हणाले.

यावेळी अध्यक्षीय समारोप करताना माजी आमदार बब्रुवान खंदाडे म्हणाले की, पत्रकारिता ही सतीचे वान आहे.पत्रकारीतेत दाहक वास्तविकता असली पाहिजे. पत्रकारीतेच्या माध्यमातुन शैक्षणिक, सामाजिक, राजकीय इत्यादी विकासाचे कामे झाली पाहिजेत असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी जेष्ठ संपादक रामेश्वर बद्दर यांना सन 2019-20 चा दर्पण सेवा गौरव पुरस्कार देण्यात आला तर अहमदपूर येथील जेष्ठ पत्रकार दिनकर मद्देवार, वडवळ येथील दै. पत्रकार संतोष आचवले, अहमदपूर येथील जेष्ठ पत्रकार बलभिम पवार,वडवळ येथील पत्रकार भरसिंह ठाकूर यांना दर्पण जीवन गौर पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी रामेश्वर बद्दर, दिनकर मद्देवार,प्रा.विश्वंभर स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य संगीत कला अकादमीचे अध्यक्ष डॉ. सिध्दार्थकुमार सुर्यवंशी यांनी केले.सुत्रसंचलन प्रा. मारोती बुद्रुक पाटील, प्रा.डॉ. कारामुंगीकर बालाजी यांनी केले तर उपस्थितांचे आभार जीवनराव गायकवाड यांनी मानले.
यावेळी अहमदपूर-चाकूर परिसरातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष प्रशांत जाभाडे,जीवनराव गायकवाड,गफारखान पठाण,विलास चापोलीकर, अजय भालेराव,शरद सोनकांबळे, शिवाजी भालेराव, भिमराव कांबळे, शरद कांबळे,मिथुन मोरे, चंद्रकांत कांबळे यासह साहित्य संगीत कला अकादमीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here