नांदेड सप्टेंबर 2023 : प्रदीर्घ काळापासून आपली परंपरा आणि दागिन्यांची उत्कृष्टता जपलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे नांदेड येथील नूतनीकृत दालनाचे उद्घाटन करण्यात आले आहे.या दालनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे ग्रामविकास, पर्यटन आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते स्वप्निल जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.सौरभ गाडगीळ, पराग गाडगीळ आणि पीएनजी ज्वेलर्स परिवारातील सदस्य उपस्थित होते.
नांदेडमधील सन्मान प्रेस्टिज येथे स्थित असलेले पीएनजी ज्वेलर्सचे नूतनीकृत केलेले हे दालन 1600 चौरस फुटांच्या विस्तृत जागेत विस्तारलेले आहे. हे दालन सोने,चांदी आणि नैसर्गिक हिर्यांचा समावेश असलेली दागिन्यांची विस्तृत श्रेणी ग्राहकांसाठी प्रदान करेल.

ब्रँडप्रती असलेले प्रेम,ग्राहकांकडून मिळालेला मौल्यवान प्रतिसाद लक्षात घेता पीएनजी ज्वेलर्स ने या दालनाचे नूतनीकरण व विस्तार केला आहे.
पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की ,नांदेड मधील आमच्या नूतनीकृत दालनाचे उदघाटन म्हणजे दागिने खरेदीचा उत्तम अनुभव प्रदान करण्याच्या आमच्या समर्पणाचे प्रतीक आहे. वर्षानुवर्षे ग्राहकांकडून मिळत असलेला प्रतिसाद आणि प्रेमाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आमच्या ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असलेले गिरीश महाजन म्हणाले, हे केवळ एका दालनाचे उदघाटन नसून महाराष्ट्राची संस्कृती आणि पीएनजी ज्वेलर्सचा समृद्ध वारसा जपणारा सोहळा आहे. आपली संस्कृती आणि परंपरेचे जतन करणारे हे अद्वितीय दालन आहे. या उदघाटन समारंभाचा भाग होणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. पीएनजी ज्वेलर्सच्या समृद्ध परंपरेचा भाग असलेल्या या नवीन दालनाच्या निमित्ताने मी त्यांचे अभिनंदन करतो आणि पीएनजी ज्वेलर्सला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.

या नूतनीकृत दालनाच्या उद्घाटनाचा एक भाग म्हणून ग्राहकांना १७ ते ३० सप्टेंबर २०२३ दरम्यान सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २० टक्के सवलत आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्क्यांपर्यंतची सवलत दिली जाणार आहे.




