एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे
१३वी ‘भारतीय छात्र संसद’ एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे येथे
दि.१० ते १२ जानेवारी २०२४ या कालावधीत होणार
लातूर, दि.३० डिसेंबर: भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १३वीं भारतीय छात्र संसद दि.१० जानेवारी ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे. नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन, नॅशनल विमेन्स पार्लमेंट, सरपंच संसद यांच्या सहकार्याने ही संसद भरविण्यात येणार असून अनेक राष्ट्रीय संस्थांनीही या संसदेला पाठिंबा दिला आहे.

या संसदेचे उद्घाटन, दि.१० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. होईल. देशाची माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, यूके पार्लमेंटचे हाऊस ऑफ लॉर्डचे सदस्य मेघनाद देसाई, माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण मा. शरद पवार, व्हरमौंट विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. सुरेश गरिमला आणि जगप्रसिद्ध व्यावसायिक सल्लागार प्रा.राम चरण हे प्रमुख पाहुणे असतील. तसेच, दि.१२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता समारोप होईल. या छात्र संसदेमध्ये ६ सत्रे आयोजित केली गेली आहेत. संसदेतील सत्रे खालीलप्रमाणे :
सत्र १ : राजकारणातील युवा नेतृत्व-वक्तृत्व किंवा वास्तव
Youth Leadership in Politics – Rhetoric or Reality
सत्र २ : युगांतर – संक्रमणातील तरूण
Yugantar – Youth in Transition
सत्र ३ : लोकशाही २.० एआय आणि सोशल मीडिया गेम कसे बदलत आहेत.
Democracy 2.0 – How AI and Social Media are Changing the Game
सत्र ४ : आमच्या संस्कृतीत लोककलेची शक्ती
Power of Folklore in Our Culture
सत्र ५ : डेटा, विविधता आणि लोकशाही- कास्ट जनगणना दुविधा
Data, Diversity and Democracy – Caste Census Dilemma
सत्र ६ : आपण चंद्रावर उतरलो, पण जमिनीवर महिला सुरक्षित आहेत ?
As We Land on Moon, are Women Safe on Land
याशिवाय विशेष ‘युथ टू युथ कनेक्ट’ सत्रांचेही आयोजन केले गेले आहे.
राज्य सभेचे खासदार व अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी, अध्यात्मिक गुरू स्वामी मुकुंदानंद, प्रसिद्ध इतिहासकार आणि स्तंभलेखक डॉ.विक्रम संपत, राज्य सभा टिव्हीचे प्रमुख संपादक गुरूदिप सिंग सप्पल, उद्योजक रणवीर अल्लाबदिया, भारतीय मानवधिकार कार्यकर्ता डॉ.स्नेहल रशीद, कवी मनोज मुंतशीर, राज्य सभेचे खासदार मनोज कुमार झा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य व अभिनेत्री खुशबू सुंदर, मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील आभा सिंग, डॉ.टेसी थॉमस आणि राज्य सभेच्या सदस्य डॉ.फौजिया खान यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमे, अभिनय व उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर तीन दिवस चालणार्या या १३व्या भारतीय छात्र संसदेमध्ये युवक श्रोत्यांना संबोधित करणार आहेत.
जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, श्री. तुषार गांधी, प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, अनू आगा, अभय फिरोदिया, लोबसांग सांग्ये, मार्क टूली, जस्टिस एन. संतोष हेगडे, डॉ. विजय भटकर आणि नानीक रुपानी हे या छात्रसंसदेचे मार्गदर्शक आहेत. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे या छात्र संसदेचे संस्थापक आहेत.
छात्र संसद हा भविष्यातील राजकीय नेते घडविणारा देशातील एकमेव व विशाल प्रशिक्षण वर्ग आहे. या संसदेच्या माध्यमातून राजकारण, राजकीय नेते, लोकशाही याकडे बघण्याचा युवकांचा दृष्टिकोन बदलत आहे. या छात्र संसदेत देशभरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांतून १० हजारांहून अधिक उत्साही विद्यार्थी सहभागी होणार आहेत. छात्र संसद हा अ-राजकीय उपक्रम असून, त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.
भारतीय छात्र संसदेची प्रमुख वैशिष्टये :
-२९ राज्यांतील ४५० विद्यापीठांतील ३० हजार महाविद्यालयातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात क्रियाशील विद्यार्थ्यांचा थेट सहभाग. महाविद्यालयांच्या पातळीवर विद्यार्थ्यांची चाचणी होऊन त्यापैकी १० ते १२ हजार विद्यार्थ्यांना या छात्र संसदेत प्रत्यक्ष सहभागी करुन घेतले जाते.
-२०० विद्यापीठातील ९० हजार विद्यार्थ्यांचा वेबकास्टिंगद्वारे सहभाग.
- भारतातील ६ राज्यातील विधानसभांच्या सभापतींचा सहभाग.
- भारतातील ६ विविध विद्यापीठातील कुलगुरुंचा सहभाग
- निरनिराळ्या राज्यातील आणि विविध पक्षातील तरुण आमदारांचा सत्कार.
- आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार व आदर्श युवा विधायक पुरस्कार देण्यात येणार आहे.
- आदर्श उच्च शिक्षित युवा सरपंच सन्मान व आदर्श युवा आध्यात्मिक गुरू सन्मान सुध्दा देण्यात येणार आहेत.
अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे समन्वयक डॉ. सुनील कराड, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे प्रा. गणेश मंत्री, दयानंद सायन्स कॉलेजचे प्रा.डॉ. विजेंद्र चौधरी, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे व प्रा.माधव शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.




