●अभियंता गणेश गाडगीळ ” अभियंता जानाईश्री ” पुरस्काराने सन्मानित●
◆अभियांत्रिकी महाविद्यालयातील गरजू हुशार होतकरू ११ विद्यार्थ्यांना जानाई शिष्यवृतीच्या धनादेशाचे वितरण◆
लातूर : ( माध्यम वृत्तसेवा)_ पु.ना.गाडगीळ परिवारात चांदीच्या भांड्याचा कारखाना काढायचा होता त्यासाठी घरचा इंजिनिअर असावा यासाठी गणेश गाडगीळ यांना आजोबांनी मेकॅनिकल इंजिनिअरीग करायला लावले. पूढे कारखाना कांही झाला नाही पण पु.ना.गाडगीळ व्यवसायात आभियांत्रिकी शिक्षण उपयोगी ठरले असे उदगार सांगली अर्बन बॅंकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी श्री जानाई प्रतिष्ठान संस्थेचा ” अभियंता जानाईश्री ” पुरस्कार स्विकारल्या नंतर काढले.

१५ सप्टेंबर अभियंता दिनी कार्याप्रती निष्ठा व समाजाप्रती बांधिलकी या निकषानुसार अभियंता गणेश गाडगीळ यांची अभियंता जानाईश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन जानाई सभाग्रहात करण्यात आले . या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष अभियंता प्रवीण सरदेशमुख, अभियंता अतुल ठोंबरे, दत्तात्र्येय मुंढे,विद्यार्थी मंडळाचा अध्यक्ष अवधुत जोशी उपस्थित होते.

याच कार्यक्रमात अभियांत्रिकी महाविद्यालयातील गरजू, हुशार, होतकरू अकरा विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी ” जानाई अभियांत्रिकी शिष्यवृत्तीच्या ” धनादेशचे वितरण गणेश गाडगीळ व प्रवीण सरदेशमुखांच्या हस्ते करण्यात आले.प्रवीण सरदेशमुख यांनी भविष्यातील संभाव्य *पर्यावरण विषयक धोके* आणि भावी अभियंते व नागरिक यांची त्या बाबतची *जबाबदारी* यावर सुयोग्य मार्गदर्शन करत अध्यक्षीय समारोप केला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अभियंता गीता ठोंबरे यांनी केले. गाडगीळ व सरदेशमुख यांच्या परिचय पत्राचे वाचन अभियंता महेंद्र जोशी यांनी केले. गणेश गाडगीळ यांच्या सन्मानपत्राचे वाचन अभियंता ऋचा ठोंबरे यानी केले.विद्यार्थी मंडळाचा अवधुत जोशी यांनी सर विश्वेश्वरय्याच्या कार्याची माहिती दिली तर समर्थ कुलकर्णी यांनी जानाई कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. दत्तात्र्यय मुंढे यानी आभार वक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
